क्यूएस क्रमवारीत भारतातील शैक्षणिक संस्थांची घसरण

नवी दिल्ली : शैक्षणिक संस्थांची जागतिक क्रमवारी ठरविणाऱ्या क्यूएस क्रमवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यंदा आशियाई विद्यापीठांच्या अव्वल १०० संस्थांच्या यादीत भारतातील सात शैक्षणिक संस्थांनी स्थान मिळवले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील प्रमुख संस्थांच्या विशेषतः आयआयटींच्या क्रमवारीमध्ये मोठी घसरण झाली आहे. यंदा आयआयटी दिल्ली आणि मुंबईने पहिल्या १०० संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे.


हाँगकाँग विद्यापीठाने यावर्षी पेकिंग युनिव्हर्सिटीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. यावर्षी १,५०० हून अधिक संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले, ज्यात ५५०+ नवीन प्रवेशिका समाविष्ट आहेत. लंडनमधील क्वाक्वेरेली सायमंड्सने (क्यूएस) जाहीर केलेल्या आशियाई विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये अव्वल १०० संस्थांच्या यादीत सात भारतीय संस्थांनी स्थान मिळवले आहे. यामध्ये आयआयटी दिल्लीने सलग पाचव्या वर्षी भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकीक कायम ठेवला आहे.


त्यानंतर आयआयएससी बंगळुरू ६४ व्या, आयआयटी मद्रास ७० व्या, आयआयटी मुंबई ७१ व्या, आयआयटी कानपूर आणि आयआयटी खरगपूर ७७ व्या आणि दिल्ली विद्यापीठ ९५ व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पहिल्या २०० मध्ये २० आणि ५०० संस्थांमध्ये ६६ संस्थाचा समावेश आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.


आयआयटी दिल्लीने देशात अव्वल राहण्याचा मान कायम ठेवला असला तरी गतवर्षीच्या ४४ व्या स्थानावरून यंदा ५९ व्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याचबरोबर आयआयएससी बंगळुरूची ६२ व्या स्थानावरून ६४ व्या स्थानी, आयआयटी मद्रासची ५६ व्या स्थानावरून ७० व्या स्थानी, आयआयटी कानपूर आणि आयआयटी खरगपूर अनुक्रमे ६७ व्या आणि ६० व्या स्थानावरून ७७ व्या स्थानी आणि दिल्ली विद्यापीठ ८१ व्या स्थानावरून ९५ व्या स्थानी घसरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील १०५ संस्थांच्या क्रमवारीत घसरण झाली असून, १६ संस्थांचे स्थान कायम राहिले आहे, तर ३६ संस्थांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.


गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय शैक्षणिक संस्थांच्या गुणांमध्ये सुधारणा झाली असली तरी आशियातील अन्य संस्थांच्या तुलनेत क्रमवारीत घसरण झाल्याचे क्यूएसने जाहीर केलेल्या निवेदनात
म्हटले आहे.


देशातील एकही विद्यापीठ पहिल्या ५० मध्ये नाही


आशियातील पहिल्या ५० विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. आयआयटी दिल्ली ५९ व्या क्रमांकावर आहे, तर आयआयएससी, बंगळुरू ६४ व्या क्रमांकावर आहे. या यादीत शेजारील पाकिस्तानमध्ये ८२ विद्यापीठे आहेत. यादीतील विद्यापीठांच्या संख्येच्या बाबतीत पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे. फिलिपिन्समध्ये या यादीत ३५ विद्यापीठे आहेत, जी गेल्या वर्षीपेक्षा ११ जास्त आहेत.



Comments
Add Comment

PM Narendra Modi : ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, तपास यंत्रणा सतर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना जीवे

Gujarat ATS : गुजरात एटीएसकडून जैश-ए-मोहम्मदच्या संशयित मॉड्यूलचा पर्दाफाश , ८ आरोपी अटकेत

अहमदाबाद : गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अनेक राज्यांमध्ये संयुक्त कारवाई करत, बंदी घातलेल्या

Waterfall Trip : धबधब्याखाली भिजायचंय? मग हे 5 वॉटरप्रूफ गॅझेट्स नक्की सोबत ठेवा

वॉटरफॉल ट्रिपची तयारी झाली? धबधब्याखाली (Waterfall) मनसोक्त भिजण्याचा आनंद घ्या, पण तुमचा फोन, गॅझेट्स (Gadgets) आणि

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या