क्यूएस क्रमवारीत भारतातील शैक्षणिक संस्थांची घसरण

नवी दिल्ली : शैक्षणिक संस्थांची जागतिक क्रमवारी ठरविणाऱ्या क्यूएस क्रमवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यंदा आशियाई विद्यापीठांच्या अव्वल १०० संस्थांच्या यादीत भारतातील सात शैक्षणिक संस्थांनी स्थान मिळवले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील प्रमुख संस्थांच्या विशेषतः आयआयटींच्या क्रमवारीमध्ये मोठी घसरण झाली आहे. यंदा आयआयटी दिल्ली आणि मुंबईने पहिल्या १०० संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे.


हाँगकाँग विद्यापीठाने यावर्षी पेकिंग युनिव्हर्सिटीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. यावर्षी १,५०० हून अधिक संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले, ज्यात ५५०+ नवीन प्रवेशिका समाविष्ट आहेत. लंडनमधील क्वाक्वेरेली सायमंड्सने (क्यूएस) जाहीर केलेल्या आशियाई विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये अव्वल १०० संस्थांच्या यादीत सात भारतीय संस्थांनी स्थान मिळवले आहे. यामध्ये आयआयटी दिल्लीने सलग पाचव्या वर्षी भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकीक कायम ठेवला आहे.


त्यानंतर आयआयएससी बंगळुरू ६४ व्या, आयआयटी मद्रास ७० व्या, आयआयटी मुंबई ७१ व्या, आयआयटी कानपूर आणि आयआयटी खरगपूर ७७ व्या आणि दिल्ली विद्यापीठ ९५ व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पहिल्या २०० मध्ये २० आणि ५०० संस्थांमध्ये ६६ संस्थाचा समावेश आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.


आयआयटी दिल्लीने देशात अव्वल राहण्याचा मान कायम ठेवला असला तरी गतवर्षीच्या ४४ व्या स्थानावरून यंदा ५९ व्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याचबरोबर आयआयएससी बंगळुरूची ६२ व्या स्थानावरून ६४ व्या स्थानी, आयआयटी मद्रासची ५६ व्या स्थानावरून ७० व्या स्थानी, आयआयटी कानपूर आणि आयआयटी खरगपूर अनुक्रमे ६७ व्या आणि ६० व्या स्थानावरून ७७ व्या स्थानी आणि दिल्ली विद्यापीठ ८१ व्या स्थानावरून ९५ व्या स्थानी घसरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील १०५ संस्थांच्या क्रमवारीत घसरण झाली असून, १६ संस्थांचे स्थान कायम राहिले आहे, तर ३६ संस्थांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.


गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय शैक्षणिक संस्थांच्या गुणांमध्ये सुधारणा झाली असली तरी आशियातील अन्य संस्थांच्या तुलनेत क्रमवारीत घसरण झाल्याचे क्यूएसने जाहीर केलेल्या निवेदनात
म्हटले आहे.


देशातील एकही विद्यापीठ पहिल्या ५० मध्ये नाही


आशियातील पहिल्या ५० विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. आयआयटी दिल्ली ५९ व्या क्रमांकावर आहे, तर आयआयएससी, बंगळुरू ६४ व्या क्रमांकावर आहे. या यादीत शेजारील पाकिस्तानमध्ये ८२ विद्यापीठे आहेत. यादीतील विद्यापीठांच्या संख्येच्या बाबतीत पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे. फिलिपिन्समध्ये या यादीत ३५ विद्यापीठे आहेत, जी गेल्या वर्षीपेक्षा ११ जास्त आहेत.



Comments
Add Comment

पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला

ओरैया : उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाचा गेली.

दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ): दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात

Para-athlete...लग्नातील किरकोळ वादातून हरियाणातील पॅरा-अ‍ॅथलिटची निर्घृण हत्या

हरियाणा : रोहतक येथे एका राष्ट्रीय स्तरावरील पॅरा-अ‍ॅथलिटवर झालेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात

जागतिक एड्स दिन २०२५ : एड्स इन्फेक्शन कशामुळे पसरतो? एचआयव्ही संसर्ग टाळण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी!

जगभरात आज, १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन (World AIDS Day) साजरा केला जातो. हा दिवस एड्ससारख्या (AIDS) अतिशय धोकादायक

आजपासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडणार तीन महत्त्वाची विधेयकं, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन १ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान चालेल ज्यात

Parliament Winter Session : आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखू महागणार, अर्थमंत्री सीतारामन आज विधेयक सादर करणार

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकार