प्रतिनिधी: हाउसिंग डॉट कॉम या रिअॅलिटी पोर्टलच्या ताज्या अहवालानुसार, मुंबई क्षेत्रात, घरांची विक्री ३००१० युनिट्सवरून ४% घसरून २८६९० युनिट्सवर पोहोचली. शेवटी, पुण्यात जुलै-सप्टेंबर या कालावधीत घरांची विक्री ११% घसरून १५९५० युनिट्सवर पोहोचली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत १८००४ युनिट्स होती. मात्र याशिवाय जुलै-सप्टेंबरमध्ये मागणी वाढल्याने टॉप आठ शहरांमध्ये निवासी मालमत्तेची विक्री किंचित वाढून ९६८२७ युनिट्सवर पोहोचली आहे.
मागील वर्षीच्या याच कालावधीत घरांची विक्री ९६५४४ युनिट्स होती.या कॅलेंडर वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत टॉप आठ निवासी बाजारपेठांमध्ये एकूण ९४४१९ नवीन घरे लाँच करण्यात आली तो आकडा मागील वर्षाच्या याच कालावधीत ९१८६३ युनिट्सवर होता असे हाउसिंग डॉट कॉमने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या आरईए ग्रुपचा भाग असलेल्या आरईए इंडियाकडे हाऊसिंग डॉट कॉम पोर्टल आहे.
REA इंडियाचे सीईओ प्रवीण शर्मा म्हणाले,'गेल्या अर्ध्या दशकातील किमतीतील तेजीमुळे परवडणाऱ्या घरांच्या विभागातील विक्रीत घट झाली आहे, जी या क्षेत्राच्या दीर्घकालीन शाश्वतता आणि वाढीसाठी महत्त्वाची आहे.' ग्राहकांच्या भावनेमुळे प्रीमियम आणि उच्च श्रेणीतील घरांमध्ये मागणी आणि पुरवठा मजबूत राहिला आहे, परंतु मागणी स्थिर असूनही परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीतील पुरवठा मर्यादित राहिला आहे.' असेही ते म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले आहेत की,'द्विस्तरीय दृष्टिकोन आवश्यक आहे. प्रथम, परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीतील पुरवठा वाढवण्यासाठी विकासकांना प्रोत्साहित केले पाहिजे आणि दुसरे म्हणजे, अंतिम वापरकर्त्यांसाठी परवडणारी क्षमता सुधारली पाहिजे.'
मुंबई व्यतिरिक्त इतर शहरातील वर्गीकरणातील आकडेवारीनुसार, अहमदाबादमधील घरांची विक्री जुलै-सप्टेंबर दरम्यान ११% घसरून ८२९७ युनिट्सवर आली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ९३५२ युनिट्स होती.तथापि, बेंगळुरूमध्ये विक्री २३% वाढून ११,१६० युनिट्सवरून १३६८८ युनिट्सवर पोहोचली आहे.चेन्नईमध्ये, विक्री ५१% वाढून ३५६० युनिट्सवरून ५३८९ युनिट्सवर पोहोचली आहे.परंतु दिल्ली-एनसीआरमध्ये विक्री १४% घसरून १००९८ युनिट्सवरून ८६६८ युनिट्सवरआली. हैदराबादमध्ये विक्री ५% वाढून ११५६४ युनिट्सवरून १२१३८ युनिट्सवर पोहोचली.कोलकातामध्ये २७९६ युनिट्सवरून ४३% वाढून ४००७ युनिट्सवर पोहोचली आहे.