मी झोपलेली असताना तो माझ्या खोलीत आला... फराहने सांगितला तो किस्सा!

मुंबई : काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या 'टू मच' या चॅट शोमध्ये अभिनेत्री अनन्या पांडेसह फराह खानने हजेरी लावली होती. यावेळी फराहने तिच्या बॉलीवूडमधील प्रवासाबद्दल बरेच किस्से सांगितले. तसेच सिनेसृष्टीत होणाऱ्या महिलांच्या छळाबद्दल सांगताना तिने तिच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल सांगितले.


सिनेसृष्टीतील छळाविषयी बोलताना फराहने एक किस्सा सांगितला. ती नृत्य दिग्दर्शन करत असतानाचा अनुभव फराहने कथन केला. नृत्य दिग्दर्शिका म्हणून काम करत असताना एका दिग्दर्शकाने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला असे फराह म्हणाली.




ती झोपेत असताना तो थेट तिच्या रूममध्ये घुसला. काहीतरी चर्चा करण्यासाठी तो माझ्या खोलीत आला आणि माझ्या शेजारी बसला. यावेळी मी त्याला तिथून हाकलून दिले; असे फराहने सांगितले.


ही घटना घडली, त्यावेळी तिथे ट्विंकल खन्ना देखील उपस्थित होती असेही फराहने सांगितले. यावर ट्विंकल म्हणाली की, "हो, मी त्या घटनेची साक्षीदार आहे. तो दिग्दर्शक फराहच्या मागे लागला होता. त्याला फराहचा फायदा घ्यायचा होता. फराहने त्याला खोलीबाहेर काढले.

Comments
Add Comment

म्युझिकल नाईटमध्ये ‘वध 2’ स्टार्सची झगमगती एन्ट्री

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी वाढवली म्युझिकल इव्हेंटची शोभा ‘वध 2’, ज्यात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची

'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर चलती! दोन दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार

आदित्य धर यांचा वादग्रस्त धुरंधर अखेर ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या

हिंदी 'बिग बॉस सीझन १९' चा अंतिम सोहळा! कोण कोरणार ट्रॉफिवर नाव?

तीन महिन्यांहून अधिक काळ नाट्यमय संघर्ष, युती आणि भावनिक चढ-उतारांनंतर, 'बिग बॉस १९' चा महाअंतिम सोहळा आज पार पडणार

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच