पुण्यात नेमकं घडतय काय? दहशतवादी संघटनेचा प्रसार-प्रचार करणाऱ्या जुबेरचे परदेशात संबंध! 'एटीएस'ची सखोल चौकशी सुरू

पुणे: 'अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट' (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता व सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर याला 'एटीएस'ने २७ ऑक्टोबर रोजी अटक केली. जुबेर कोंढव्यातील कौसरबाग येथे कुराण, हदीस, खिलाफत या विषयांवर आक्रमक उपदेश द्यायचा. त्याला अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या साथीदारांनी या ठिकाणावरून काही संशयित पुस्तके, प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे गोळा करून काळेपडळ येथील एका मदरशाच्या मोकळ्या जागेत जाळल्याचे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे जुबेरच्या साथीदारांना सुद्धा एटीएसने ताब्यात घेतले आहे.


'एटीएस'च्या तपास पथकाने काळेपडळ येथील मदरशाच्या मोकळ्या जागेचा पंचनामा करत काही अर्धवट जळालेली कागदपत्रे ताब्यात घेतली. याव्यतिरिक्त जुबेर व त्याचे साथीदार कौसरबागेतील एका इमारतीच्या तळघरातील मदरशामध्ये एकत्रित जमायचे अशी माहिती तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी मिळाली. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी तळघरातील मदरशाचा पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. जुबेरची खोल चौकशी करण्यासाठी त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील विजय फरगडे व तपास अधिकारी सहायक आयुक्त अनिल शेवाळ यांनी केली असल्याने त्याच्या कोठडीत १४ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान जुबेरच्या जवळच्या साथीदारांपैकी १८ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.



या मुद्द्यांवर होणार तपास

- जुबेरच्या मोबाईल व लॅपटॉपमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या डेटाचे विश्लेषण



-लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मिळालेल्या पीडीएफ फाइल व चॅटिंगमध्ये काही सांकेतिक भाषेचा व शब्दांचा वापर असल्याने त्याची चौकशी



-आरोपीच्या जवळच्या साथीदाराच्या घरातून २ लाख ३५ हजार रुपये हस्तगत. ही रक्कम कोणाकडे आणि कशासाठी जाणार होती?



-आरोपीच्या साथीदारांनी कोणती पुस्तके, कागदपत्रे जाळली? त्यामध्ये नेमकं काय होतं?



-आरोपीने कोंढव्यातील मशि‍दीत 'क्यूआर कोड' लावून स्वतःच्या खात्यावर पैसे घेतल्यामुळे या खात्यांचे 'फॉरेन्सिक ऑडिट'



-आरोपी धार्मिक विषयांवर प्रश्नमंजुषा घेऊन विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब, स्मार्टवॉच अशी बक्षीसे द्यायचे. त्यामुळे या प्रकारातून किती तरूण त्याच्या संपर्कात आले?



-आरोपीच्या 'कॉन्टॅक्ट लिस्ट'मध्ये पाच जण परदेशातील असल्याचे आढळल्याने, हे जाळे कुठवर पोहोचले आहे याबद्दल सविस्तर

Comments
Add Comment

जमीन घोटाळ्याप्रकरणी शेख हसीनांना २१ वर्षांची शिक्षा!

मुलगा-मुलीलाही प्रत्येकी ५ वर्षांचा तुरुंगवास नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख

तिन्ही सैन्य दलासह अण्वस्त्रेही असीम मुनीर यांच्या हातात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पाकिस्तानमध्ये सेनेचे वर्चस्व किती आहे, हे यापूर्वीच जगाने बघितलेले आहे. देशाची

श्रीलंकेत ११ दिवसांपासून पावसाचे तांडव!

पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३१ जणांचा बळी; १४ बेपत्ता नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत गेल्या ११ दिवसांपासून

सोमवार आणि मंगळवारी मुंबईत पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई (३) जलवाहिनीवर, अमर महल भूमिगत बोगद्याच्या (१ व २) शाफ्टला जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर

Gauri Garje Case : अनंत गर्जेला २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Gauri Garje Case : महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे

‘घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का ? ’

नवी दिल्ली : देशभर सुरू असलेल्या मतदार यादी पुनिरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर