विमान तिकीट रद्द केल्यास २१ दिवसात पैसे परत मिळणार

मुंबई : महागडी विमान तिकिटे काढून ऐनवेळी ती रद्द करण्याची वेळ आली तर त्यावर बसणार भुर्दंड आणि पैसे परत मिळवण्यासाठी करावी लागणारी डोकेफोड आता लाकरच दूर होणार आहे , विमान तिकीट बुकिंग केल्यांनतर ते ४८ तासात रद्द केल्यास प्रवाश्याना कोणताही भुर्दंड सोसावा लागणार नाही. या कालावधीत तिकीट रद्द किंवा त्यात बदलही करता येणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालकाने (डीसीजीए) यांनी हा बदल प्रस्तावित केला आहे.

विमान कंपनीच्या संकेत स्थळावरून तिकीट बुक करून रद्द केल्यास रकमेचा परतावा हा कार्यालयीन २१ दिवसाच्या आत प्रवाश्याना मिळणार आहे. ट्रॅव्हल एजन्ट किंवा पोर्टलद्वारे तिकटी खरेदी केल्यास परताव्याची जबाबदारी संबंधित एरलाईन्सवर राहील. असे डीसीजीएने स्पष्ट केले आहे.


बुकिंग तारीखेपासून देशांतर्गत उड्डाणासाठी ५ दिवसांपेक्षा कमी आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी १५ दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिला असेल तर या सुविधेचा वापर करता येणार नाही, वापर करायचा असल्यास अधिक पैसे मोजावे लागतील. असे डीसीजीएने स्पष्ट केले आहे.


'डीसीजीए'ने असा निर्णय का घेतला ?


दोन वर्षांपासून देशात विमान प्रवाश्यांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत विमानाच्या संख्येत असलेली तफावत यामुळे प्रवासाचे दर वर्षभर गगनाला भिडलेले दिसतात. अश्या स्थितीत विमान तिकीट रद्द झाले तर कंपन्या घसघशीत शुल्क आकारणी करतात आणि प्रवाशाच्या अधिक पैसे जातात. या पार्श्वभूमीवर प्रवाशाचे नुकसान होऊ नये याकरिता हा प्रस्ताव डीसीजीए सर्व विमान कंपन्यांसमोर मांडणार आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंना अटक होणार ?

मुंबई : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी मुंबई उच्च

नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल

सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन

प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार? एकाच तारखेसाठी सत्ताधारी आणि विरोधक आग्रही

मुंबई: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि मुंबई पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांची रणनीती सुरू

मुंबईच्या महापौर आरक्षणाची पाटी नव्याने?

चक्राकार पध्दतीने नव्हे तर नव्याने आरक्षण सोडली जाण्याची शक्यता मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या आगामी

दहिसरमधून उबाठाला व्हाईट वॉश करण्याची महायुतीला संधी

मुंबई (सचिन धानजी): दहिसर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक १मध्ये म्हात्रे आणि घोसाळकर यांच्याशिवाय कुणीच

आचारसंहिता लागू, विद्रुप झालेल्या मुंबईने घेतला मोकळा श्वास; तब्बल २ हजार १०३ जाहिरात फलक हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची