भाजपचा मोठा गेमप्लॅन: नगराध्यक्षपदासाठी 'गुप्‍त' चाचपणी; ऐनवेळी घोषणा!

निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नगराध्यक्षपदाचे उमेदवार ठरवले; महायुतीचा 'प्लॅन बी' तयार?


मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. पहिल्या टप्प्यात २ डिसेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे, ज्यामुळे चार वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असतानाच, भाजपने मात्र एक मोठा आणि 'राजकीय' डाव टाकला आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करून ठेवली आहे.



'कोअर कमिटी'चा गोपनीय दौरा


निवडणूक आयोगाने मंगळवारी घोषणा केली, पण त्यापूर्वीच म्हणजे १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान भाजपने एक मोठी रणनीती आखली होती. पक्षाचे स्थानिक आमदार, जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी 'निरीक्षक' म्हणून प्रत्येक नगरपालिका व नगरपंचायतीच्या शहरांत पाठवण्यात आले होते. या निरीक्षकांनी थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या तीन-तीन उमेदवारांची नावे सीलबंद लिफाफ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केली आहेत.



६१ जणांची 'रणनीती समिती'


ज्या शहरांत निवडणुका होणार आहेत, तिथे भाजपची ६१ जणांची कार्यकारिणी सक्रिय आहे. विविध आघाड्यांच्या अध्यक्षांचाही यात समावेश होता. या ६१ सदस्यांनी स्थानिक रहिवासी असलेले जिल्हा आणि शहर पदाधिकारी यांच्याशी समोरासमोर चर्चा केली. या चर्चेतूनच नगराध्यक्षपदासाठीचे तीन सर्वात योग्य उमेदवार कोणते, याची यादी शॉर्टलिस्ट करून प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे.



'सर्वेक्षण' आणि 'गेम चेंजर' उमेदवाराची चाचपणी


प्रदेश भाजपकडून आता पुढील दोन-तीन दिवसांत या तीन नावांवर मतदारांमध्ये काय भावना आहे, तसेच तिघांपैकी कोण आघाडीवर आहे, याबद्दल सर्वेक्षण केले जाणार आहे. विशेष म्हणजे, भाजपने एक 'प्लॅन बी' देखील तयार ठेवला आहे. जर या तीन नावांव्यतिरिक्त एखादी प्रभावी आणि समाजात लोकप्रिय असलेली व्यक्ती सर्वेक्षणातून पुढे आली, जी सध्या पक्षात सक्रिय नसेल, तर तिलाही उमेदवारी देण्यावर विचार केला जाणार आहे. हा भाजपचा 'गेम चेंजर' निर्णय ठरू शकतो.



महायुतीचा फॉर्म्युला आणि रणनीती


राज्यातील २४४ नगरपालिका आणि ४४ नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यासोबतच, नगरसेवक म्हणून कोणाला संधी द्यायची आणि नेमकी निवडणुकीची रणनीती काय असावी, यावरही स्थानिक पातळीवर मते जाणून घेण्यात आली आहेत. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करायची की नाही, यावरही चर्चा झाली आहे. युती झाल्यास दोन्ही पक्षांना कशा पद्धतीने समाविष्ट करायचे, तसेच भाजपची ताकद मजबूत असलेल्या ठिकाणी स्वबळावर लढल्यास काय करायचे, याचे 'प्लॅनिंग' तयार ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Comments
Add Comment

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत

Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?

बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी

‘शाळा बंद’ धोरणाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान

हायकोर्टाने बजावली शिक्षण विभागास नोटीस अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९

Iran Israel Conflict Affect In India: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, नेमकं काय झालं?

दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या

नागझिरा अभयारण्यात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन

अमरावती : विदर्भातील निसर्गसंपन्न नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी येथील डॉ. वांगारी मुटा माथाई रोपवाटिकेत