किमान लष्कराला तरी राजकारणात ओढू नका; राजनाथ सिंह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

नवी दिल्ली : आरक्षण असले पाहिजे. आरक्षणाच्या बाजूने आम्ही देखील आहोत. आमचा पक्षानेही… जेवढे गरीब आहेत, त्या सर्वांना आरक्षण दिले. पण लष्करात जाती-पातीच्या आधारावर आरक्षण? मला वाटते की, याची चर्चा देखील झाली नाही पाहिजे. आपल्या सैन्याच्या जवानांचा एकच धर्म असतो आणि तो म्हणजे ‘सैन्य धर्म’, त्याव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म नसतो. राहुल गांधी हे संरक्षण दलांमध्ये आरक्षणाची मागणी करून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी काँग्रेसला सांगू इच्छितो की किमान आपल्या लष्कराला राजकारणात ओढू नका, असे सांगत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.


उद्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यादरम्यान प्रचार सभेत बोलताना सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर लष्कराला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आणि लष्करात विविध समाजांसाठी आरक्षणाची मागणी केल्याबद्दल त्यांच्यावर टीका देखील केली.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लष्करावर केवळ १० टक्के लोकांचे नियंत्रण असल्याचे वक्तव्य केले आहे , यावरून देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी त्यांच्यावर टीका केली. संरक्षण मंत्र्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर भारतीय लष्कराला विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचा आऱोप केला. यावेळी त्यांनी , “सैन्याला कोणताही धर्म किंवा जात नसते,” असेही स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,०००

सौदी अरेबियातील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू; भारतीय दूतावासाकडून शोकसंवेदना

सौदी अरेबियातील रियाध येथे १८ मार्च रोजी एका भारतीय नागरिकाच्या दुर्दैवी मृत्यूबाबत भारतीय दूतावासाने

भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला शोधला सुरक्षित पर्याय

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. इराणने

India-China Relations : भारत चीन संबंध अधिक दृढ होणार; बीजिंग आणि दिल्ली दरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू

भारत आणि चीन दरम्यानची हवाई वाहतूक आता पूर्ववत होत आहे. नवी दिल्ली आणि चीनची राजधानी बीजिंग दरम्यानची विमानसेवा

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशच्या उंच भागांत शुक्रवारी (२० मार्च) जोरदार हिमवृष्टी तर खालच्या भागांत मुसळधार पाऊस झाला. लाहौल

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील