प्रतिनिधी:उद्या शिख धर्म संस्थापक व शिखांचे पहिले गुरू गुरूनानक यांच्या जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. बीएसई (Bombay Stock Exchange BSE) व एनएसई (National Stock Exchange NSE) हे दोन्ही बाजार उद्या जयंतीनिमित्त बंद राहतील. उद्याची सुट्टी सोडून इतर कामाच्या दिवसांव्यतिरिक्त नेहमीप्रमाणे शनिवारी, रविवारी बाजार बंद राहणार आहे. यापुढे २५ डिसेंबरला नाताळ (Christmas) सुट्टी असेल.
एनएसईच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज, सिक्युरिटीज लेंडिंग, बॉरोइंगआणि करन्सी डेरिव्हेटिव्ह्जसह सर्व बाजार व्यवहार दिवसभरासाठी स्थगित राहतील.एकूण एक्सचेंजेसनी आर्थिक २०२५ साठी शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त एकूण १४ शेअर बाजार सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. शेअर बाजाराच्या सुट्टीव्यतिरिक्त, अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील बँका ५ नोव्हेंबर रोजी गुरु नानक देव जयंती आणि इतर प्रादेशिक सणांमुळे बंद राहतील.