क्षितिज पटवर्धन पहिल्यांदाच दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

आई - मुलाच्या गोष्टीत झळकणार लोकप्रिय कलाकार


मुंबई : जन्माच्या आधीपासूनच आपल्या आईशी आपलं नातं जुळलेलं असत. आई आपल्यासाठी अनेक भूमिका बजावत असते. आपल्या मुलाच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी असते. अश्या आई - मुलाच्या नात्याची आजच्या परिभाषेतील संवेदनशील गोष्ट सांगणाऱ्या 'उत्तर' या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंटची निर्मित असलेल्या या चित्रपटाद्वारे लेखक क्षितिज पटवर्धन दिग्दर्शनात पदार्पण करतो आहे. झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि भावेश जानवेलकर व जॅकपॉट एंटरटेनमेंट मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


'उत्तर' या सिनेमात अभिनेत्री रेणुका शहाणे आईच्या भूमिकेत झळकणार असून अभिनय बेर्डे त्यांच्या मुलाची भूमिका साकारतो आहे. अभिनेत्री ऋता दुर्गुळेची ही या सिनेमात महत्वाची भूमिका आहे. पुढील महिन्यात १२ डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.


झी स्टुडिओजमध्ये आजवर 'डबलसीट','फास्टर फेणे','धुराळा',सारख्या गाजलेल्या सिनेमाचं चित्रपटांचं लेखन करणाऱ्या शिवाय हिंदीमध्येही 'सिंघम २' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचं आणि 'ताली' यासारख्या संवेदनशील वेब सीरिजचं लेखन करणाऱ्या क्षितिजने 'उत्तर' ची कथा पटकथा लिहिली आहे. शिवाय तो या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करतो आहे. या सिनेमाबद्दल त्याने म्हटले की ,"आईला आपण नेहमी गृहीत धरलेलं असत, त्यामुळेच जवळच असूनही दुर्लक्ष होणार नातं आहे. तिचा फक्त "व्यक्ती" म्हणून विचार करणारी आणि 'आई आणि मुलं ' या नात्याचा नव्याने विचार करायला लावणारी कलाकृती करायची यातून 'उत्तर' हा सिनेमा जन्माला आला.


झी स्टुडिओजच्या मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवेलकर प्रतिक्रिया देताना म्हणाले की 'जेव्हा चित्रपटाची कथा क्षितिजने ऐकवली तेव्हाच त्या विषयाची ताकद आमच्या लक्षात आली. आई आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारी, ही आजच्या पिढीची गोष्ट प्रत्येक प्रेक्षकाला भावणारी आहे. हा चित्रपट मराठी भाषेतला असला तरी यातील भावना ही "वैश्विक" आहे आणि ती प्रत्येकाला आपलीशी वाटावी अशीच आहे.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

सणाचा खरा आनंद लुटत जॅकलिनने साजरा केला ख्रिसमस!

मुंबई: देशभरात सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सणाचा खरा उत्साह आणि

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची ग्रँड कमबॅक, मायथॉलॉजिकल एपिकमध्ये हिट जोडी पुन्हा एकत्र

१000 कोटींच्या महाप्रकल्पात अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांच्या रीयुनियनची तयारी आपण अशा एका मोठ्या बातमीबद्दल

दीपिकाच्या आठ तास कामाच्या अटीवर कियाराची प्रतिक्रिया, मातृत्वाबद्दल काय सांगतेय अभिनेत्री?

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सिनेसृष्टीत आठ तासांच्या कामाची मागणी केल्यामुळे बऱ्याच

आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही

धुरंधर स्टार रणवीर सिंगचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी भरभरून कौतुक केले, जाणून घ्या त्यांना “ज्वालामुखी” का म्हटले

धुरंधर बॉक्स ऑफिसवर सातत्याने शानदार कामगिरी करत आहे आणि आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की रणवीर सिंगबाबत