नवी मुंबई विमानतळात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या मराठी भाषिकांनाच मिळाल्या पाहिजे

मनसेची सिडको आणि कौशल्य विकास, रोजगार विभागावर धडक


नवी मुंबई : नुकत्याच उद्घाटन झालेल्या दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये ८० टक्के नोकऱ्या स्थानिक, मराठी भाषिक तरुणांनाच मिळाल्या पाहिजे, यासाठी मनसेने रणशिंग फुंकले आहे. या विषयासाठी मंगळवारी मनसेचे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिडको सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल आणि रोजगार विभाग उपायुक्त सचिन जाधव यांची भेट घेतली. सिडकोकडून माहिती अधिकारात मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार सदर विमानतळ प्रकल्पात स्थानिक आणि मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भात सिडकोने कोणतेही धोरण आखले नाही. तसेच आतापर्यंत या प्रकल्पात किती स्थानिक मराठी भाषिकांना समाविष्ट केले, याची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितलं. यावेळी शांतनू गोयल यांनी भूमिपुत्रांसाठी कौशल्य रोजगार विभागासोबत मिळून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असल्याची माहिती दिली. तसेच स्थानिकांना जास्तीत जास्त नोकरीत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मनसेला दिले.


या सोबत मनसे शिष्टमंडळाने कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता विभागाचे उपायुक्त सचिन जाधव यांची भेट घेतली. रोजगार विभाग यांच्या अनास्थेमुळे मराठी तरुणांना विमानतळ प्रकल्पात नोकरी मिळत नसल्या बाबत नाराजी व्यक्त केली. तसेच येत्या काही दिवसांत याबाबत कौशल्य, रोजगार विभागाने कार्यवाही नाही केली तर मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा गजानन काळे यांनी दिला. मनसेच्या शिष्टमंडळात मनसे प्रवक्ते व नवी मुंबई शहरअध्यक्ष गजानन काळे, पनवेल शहरअध्यक्ष योगेश चिले, नवी मुंबई मनसे उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, विलास घोणे, अभिजीत देसाई, मनसे रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, मनपा शहरअध्यक्ष अप्पासाहेब कोठुळे, महिला सेना शहरअध्यक्ष आरती धुमाळ, विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष संदेश डोंगरे आणि विभागअध्यक्ष भूषण कोळी, अमोल आयवळे, अक्षय भोसले उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील