मोहित सोमण: एनएसईकडून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना दिलासाजनक बातमी आहे. आता फ्युचर अँड ऑप्शन्स (Future and Options (F&O) ट्रेडिंग करत असलेल्या भागभांडवलधारकांना आता एनएसई प्री-ओपन सत्रातही सहभागी होता येणार आहे. दिवसांच्या सुरूवातीला आपली खरेदी सेटलमेंट करण्यासाठी सेबीने ही परवानगी दिली आहे. एनएसईत ८ डिसेंबर २०२५ पासून हा नियम लागू होईल. त्यामुळे आता निर्देशांकातील किंमती व फ्युचर शेअरमधील किंमती सत्र सुरु होण्यापूर्वीच 'प्री ओपनिंग सेशन' मध्ये बघता येतील. त्यामुळे सेटलमेंट दृष्टीने ही सवड गुंतवणूकदारांना मिळणार असून बाजाराच्या दृष्टीनेही स्थैर्य शेअरमधील किंमतीला मिळेल. या निर्णयातून शेअरमधील अवाजवी चढउतार थांबणार असून गुंतवणूकदारांना मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे. सकाळी ९ ते ९.१५ या कालावधीत ही मुभा एफ अँड ओ गुंतवणूकदारांना असेल. एनएसईत सुरुवातीला प्री ओपनिंग सत्रात गुंतवणूकदारांना आपल्या खरेदीचा व्यवहार सेटल करता येणार आहे. ज्यात खरेदी, तांत्रिक बदल (Modify) अथवा विक्री या पर्यायाचा वापर करता येईल. हे व्यवहार साधारणतः ९.०७ ते ९.८ वाजेपर्यंत बंद होतील. त्यामुळे शेवटच्या मिनिटांत अतिरिक्त हाताळणी (Manipulation) रोखण्यास नियामकांना (Regulators) मदत मिळेल. माहितीनुसार, हे व्यवहार सेटलमेंट झाल्यावर दोन विंडो ऐवजी एकच विंडो खुली राहील ज्यामध्ये मागणी पुरवठा यंत्रणेद्वारे (Machanism) शेअरची ओपनिंग प्राईज ठरवली जाणार आहे. त्यानुसार त्या ऑर्डरची किंमत निश्चित केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
प्री-ओपन सुरुवातीला फक्त इंडेक्स आणि एकट्या स्टॉक्सवरील चालू महिन्याच्या फ्युचर्सवर लागू होईल. एक्सपायरीच्या आधीच्या शेवटच्या पाच ट्रेडिंग दिवसांमध्ये ही यंत्रणा पुढील महिन्याच्या फ्युचर्सवर देखील लागू केली जाईल असे एनएसईकडून सांगण्यात आले आहे.
माहितीनुसार, हे दूरच्या महिन्याचे करार, पर्याय, स्प्रेड ऑर्डर किंवा कॉर्पोरेट कृतींमुळे एक्स-डेटवर ट्रेडिंग करणाऱ्या फ्युचर्सवर लागू होणार नाही. नियमित ट्रेडिंग दरम्यान लागू होणारे समान मार्जिन नियम प्री-ओपन दरम्यान देखील लागू होतील. जर एखाद्या व्यापाऱ्याकडे पुरेसे मार्जिन नसेल तर ऑर्डर सिस्टममध्ये येऊ दिली जाणार नाही.
या विंडोमध्ये स्टॉप-लॉस किंवा आयओसी(तात्काळ-किंवा-रद्द करा) सारखे विशेष ऑर्डर प्रकारांना परवानगी दिली जाणार नाही. फक्त नियमित मर्यादा आणि मार्केट ऑर्डरना परवानगी असेल. प्री-ओपनमध्ये ट्रेड जुळल्यानंतर, ते रद्द करता येणार नाहीत त्यामुळे विचारपूर्वक ऑर्डर देणे महत्त्वाचे ठरेल. जुळणारे नसलेले ऑर्डर सामान्य सत्रात पुढे नेले जातील. लिमिट ऑर्डर त्याच टाइम-स्टॅम्पसह राहतील. जुळणारे न सापडणारे मार्केट ऑर्डर शोधलेल्या ओपनिंग किंमतीवर लिमिट ऑर्डरमध्ये रूपांतरित होतील.
एफ अँड ओ (F&O) मध्ये खूप सक्रिय असलेल्या व्यापाऱ्यांसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे रात्रीच्या घडामोडींवर प्रतिक्रिया देण्यासाठी एक पर्याय नियामक (SEBI) ने करून दिला आहे. या नव्या नियमामुळे जागतिक शेअर बाजारातील चलन, कमोडिटीज, चलने किंवा बाजाराच्या वेळेबाहेर येणाऱ्या प्रमुख बातम्या असोत यावर लक्ष केंद्रित करणे गुंतवणूकदारांना सोईचे ठरणार आहे.
सकाळी ९:१५ वाजेपर्यंत वाट पाहण्याऐवजी आणि कधीकधी गोंधळलेल्या व्यापाराच्या पहिल्या मिनिटाला सामोरे जाण्याऐवजी, सतत सत्र सुरू होण्यापूर्वी बाजाराला एक स्पष्ट संदर्भ किंमत मिळेल. यामुळे पारदर्शकताही देखील वाढेल असे तज्ञांचेही मदत आहे. नवीन प्रणालीसाठी एनएसईकडून मॉक ट्रेडिंग ६ डिसेंबर रोजी होईल, ज्यामुळे ब्रोकर आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्मना लाईव्ह रोलआउटपूर्वी त्यांच्या सिस्टम समायोजित (Adjustments) करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.