२०११ च्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला १३ वर्षांनी जामीन!

उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जामिनावर केली सुटका


मुंबई : १३ जुलै २०११ च्या भीषण तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी गेल्या तेरा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या कफील अहमद मोहम्मद अयुब (६५) याला मुंबई उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) जामीन मंजूर केला. या जीवघेण्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला होता आणि १२७ जण जखमी झाले होते.


न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरआर भोसले यांच्या खंडपीठाने १ लाख रुपयांच्या जामिनावर अयुबला जामीन दिला आहे. या प्रकरणातील कोर्टाच्या संपूर्ण आदेशाची प्रत अद्याप जाहीर झालेली नाही. मूळचा बिहारचा असलेला अयुब फेब्रुवारी २०१२ पासून मुंबई सेंट्रल तुरुंगात सतत कोठडीत आहे.


२०११ मध्ये, झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर काबुतरखाना या तीन ठिकाणी अवघ्या १० मिनिटांच्या अंतराने स्फोट झाले होते. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने हे हल्ले घडवून आणल्याचा आरोप केला होता.


अयुबचे वकील मुबीन सोळकर यांनी युक्तिवाद केला की, खटला अतिशय संथ गतीने चालत असताना त्यांचा पक्षकार एक दशकाहून अधिक काळ तुरुंगात आहे. अभियोग पक्षाने ८०० साक्षीदारांची तपासणी करण्याचे सांगितले होते, पण आतापर्यंत केवळ १७० हून अधिक साक्षीदारांचीच साक्ष झाली आहे. अयुबने आपल्यावरील आरोपांना खोटे ठरवत आणि अटकेपूर्वी दिलेला कबुलीजबाब ऐच्छिक नव्हता, असा दावा करत जामिनाची मागणी केली होती.

Comments
Add Comment

...तर मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मागील चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील

मुंबई महापालिकेच्या या दोन विभागांना लाभले कायम सहायक आयुक्त

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदांच्या अनेक जागा रिक्त असून अनेक ठिकाणी प्रभारी सहायक

निवडणूक आयोग 'सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं'! राज ठाकरेंचा हल्लाबोल

पत्रकार परिषद पाहून मनसे अध्यक्ष संतापले; म्हणाले, 'आयोग निष्पक्ष नाही, महाराष्ट्रातील जनतेचा हा ढळढळीत

मेट्रो १' तात्पुरती विस्कळीत; प्रवाशांची तारांबळ

मुंबई : घाटकोपर- अंधेरी- वर्सोवा मेट्रो- १' सेवा तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास विस्कळीत

बॅगच्या अस्तरमध्ये लपवले होते ८७ लाख; दुबईहून आलेल्या प्रवाशाला अटक!

मुंबई कस्टम्सची मोठी कारवाई; विदेशी चलनाचा मोठा साठा जप्त मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय