मुंबई: अखेर एकता कपूरने, 'नागिन ७' या शोमध्ये यावेळी मुख्य भूमिकेत प्रियंका चहर चौधरी ही अभिनेत्री दिसणार आहे. सलमान खानच्या 'बिग बॉस १९'च्या वीकेंडला 'नागिन ७' मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा प्रसिद्ध करण्यात आला. मागील काही दिवसांपासून 'नागिन ७' या शोच्या प्रमुख भूमिकेत कोण असणार? याबाबत समाज माध्यमांवर चर्चा सुरू होत्या.
गेल्या अनेक वर्षांपासून एकता कपूरचा 'नागिन' शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद आहे. अलिकडेच 'नागिन ७' चा प्रोमो शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून चाहते मुख्य अभिनेत्रीची उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर निर्माती एकता कपूरने अभिनेत्रीचा चेहरा समोर आणला आहे.
'नागिन ७' च्या मुख्य भूमिकेबद्दल सांगताना प्रियांका म्हणाली की, "बिग बॉस १६ मधील तो क्षण मला अजूनही आठवतो जेव्हा एकता मॅडम म्हणाल्या होत्या की, त्यांना पुढची नागिन सापडली आहे आणि त्यांनी ते वचन पाळत शोसाठी मला निवडले हा खरोखरच एक सन्मान आहे."
नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या (DY Patil Sports Academy) रोषणाईत, २ नोव्हेंबर (रविवार) रोजी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय ...
प्रियंका चहर चौधरी ही TV वरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'उडारियां' या मालिकेतून प्रियंका चहर चौधरीला खूप लोकप्रियता मिळाली. याव्यतिरिक्त 'दस जून की रात' या वेब सीरिजमध्ये प्रियंका चहर दिसली. तर बिग बॉसच्या १६व्या पर्वात ती टॉप तीन स्पर्धकांपैकी एक होती.
आजवर नागिनच्या भूमिकेत अनेक प्रसिद्ध अभिनेत्री झळकल्या आहेत. यात मौनी रॉय, सुरभि ज्योती, अनिता हसनंदानी, निया शर्मा, जॅस्मिन भसीन, सुरभी चंदना आणि तेजस्वी प्रकाश यांचा समावेश आहे. आता 'नागिन ७'च्या मुख्य भूमिकेत प्रियंका चहर चौधरी दिसणार आहे.