Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या वाढलेल्या वर्दळीसोबतच या मार्गावरच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोस्टल रोडवर अनेक ठिकाणी अनियंत्रित वेगमर्यादेमुळे अपघाताची काही प्रकरणे घडली आहेत. या गंभीर परिस्थितीत, वरळी (Worli) ते वांद्रे सी लिंक (Bandra Sea Link) दरम्यान असलेल्या मार्गावरील खांबांवरील पथदिवे वारंवार बंद राहत आहेत. यामुळे वाहनचालकांना संपूर्ण अंधारातून प्रवास करावा लागत आहे. पथदिवे बंद असल्याने आणि वेगमर्यादेवर नियंत्रण नसल्यामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन मार्गावरील दिवे सुरू करण्याची आणि वेगमर्यादेचे नियम काटेकोरपणे पाळण्याची मागणी नागरिक करत आहेत.



कोस्टल रोडवर वेगाचे उल्लंघन आणि अंधार; मुंबईकरांचा संताप


दरम्यान कोस्टल रोडवरील दिवे बंद असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. एका प्रवाशाने सोशल मीडियावरुन या गंभीर समस्येबाबत तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईकरांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. कोस्टल रोडच्या उभारणीसाठी तब्बल १४ हजार कोटी रुपये (₹14,000 Crore) खर्च करूनही प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर विजेच्या खांबांसाठी मुंबईकरांनी आपल्या खिशातून पैसे द्यायचे का? असा संतप्त सवाल मुंबईकरांनी उपस्थित केला आहे. कोस्टल रोड सुरू झाल्यापासून सप्टेंबरपर्यंत आठ हजारांहून अधिक वाहनांनी वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. विशेषतः, बोगद्यात वाहनांचा वेग ताशी १४१ ते १४७ किमीपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे. भरधाव वेग आणि कोस्टलवरील वळणांच्या मार्गावर असलेला अंधार, यामुळे भविष्यात अपघातांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने दिव्यांची समस्या सोडवावी आणि वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी जोर धरत आहे.



कोस्टल रोडवरील भुयारी मार्गातही अंधार! नागरिकांना मोबाईलचा आधार


मुंबईकरांना समुद्राचे सौंदर्य जवळून न्याहाळता यावे म्हणून महानगरपालिकेने (BMC) कोस्टल रोडवर प्रोमेनाड खुला करून दिला आहे. मात्र, कोस्टल रोडप्रमाणेच, त्यावर जाण्यासाठी बांधलेल्या पादचारी भुयारी मार्गातही अंधार असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. भुयारी मार्गातून प्रवास करताना नागरिकांना मोबाईलच्या लाईटचा वापर करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ऑक्टोबर महिन्यात कोस्टल रोडवर वेगमर्यादेचे उल्लंघन करत एक कार संरक्षक कठडा तोडून थेट समुद्रात कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत रोडच्या लोखंडी रेलिंगचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीबद्दल पालिकेने संबंधित तरुणाला दोन लाख ६५ हजार रुपये नुकसानभरपाई भरण्यासाठी पत्र पाठवले आहे. कोस्टल रोडवर दिवे बंद असणे आणि पादचारी मार्गातही अंधार असणे, ही बाब १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या प्रकल्पाच्या व्यवस्थापनावर मोठी टीका करणारी आहे.

Comments
Add Comment

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावर प्रवास होणार अधिक आरामदायी, सहा डब्यांच्या मेट्रोची तयारी

मुंबई : मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी! वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर आता प्रवास अधिक आरामदायी

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

हरमनप्रीतची विनम्रता ; विश्वचषक स्वीकारण्याआधी कोच अमोल आणि जय शाह यांच्या पाया पडली

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहास रचत पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकला आहे. या ऐतिहासिक

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! कणकवली सिंधुदुर्गला मिळणार ८ एक्सप्रेसचा थांबा

मुंबई : कोकणकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. कोकणात धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली

प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड