बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांना मातृशोक

मुंबई : बॉलीवूडमधील अभिनेता पंकज त्रिपाठी याची आई हेमवंती देवी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्या ८९ वर्षांच्या होत्या. हेमवंती देवी यांनी बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड या त्यांच्या मूळ गावी अखेरचा श्वास घेतला. या प्रसंगी पंकज त्रिपाठी हेमवंती देवीं जवळ उपस्थित होते.


पंकज त्रिपाठी हे मूळचे बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील असून सध्या ते मुंबईत आपल्या कारकिर्दीत व्यस्त आहेत. त्यांचे आई-वडील मात्र गावातच वास्तव्यास होते. पंकज यांच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. वडील हे शेतकरी होते आणि त्यांना मुलाच्या अभिनय कारकिर्दीत विशेष रस नव्हता, असे पंकज यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.


अभिनेता पंकज त्रिपाठी यांचे बालपण गोपालगंज येथेच गेले. त्यांचे पुढील शिक्षण पाटणा येथे झाले. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि मेहनतीच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले.

Comments
Add Comment

'नागिन ७' मध्ये दिसणार प्रियांका चहर चौधरी

मुंबई: अखेर एकता कपूरने, 'नागिन ७' या शोमध्ये यावेळी मुख्य भूमिकेत प्रियंका चहर चौधरी ही अभिनेत्री दिसणार आहे.

तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून बाहेर? सोशल मीडियावरील चर्चांवर ; अभिनेत्रीचं स्पष्ट उत्तर

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या स्वानंदीची

शाहरुखचा ६० वा वाढदिवस! मात्र बॉलिवूड बादशहा घराच्या गॅलरीत आलाच नाही, चाहत्यांचा हिरमोड

मुंबई: बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने आता साठी ओलांडली आहे. रविवारी २ नोव्हेंबरला शाहरुखचा साठावा वाढदिवस होता.

रील्सस्टारना मालिका आणि चित्रपटांमध्ये संधी देण्याबाबत 'या' मराठी कलाकाराने व्यक्त केली नाराजी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहेतच. याच

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल; नेमके काय झाले ?

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत.

मन्नत मध्ये रूम मिळेल का? या प्रश्नावर शाहरुख खानचे "हे" मिश्किल उत्तर

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याने गुरुवारी ऑक्टोबर २०२५ रोजी त्याच्या ट्विटर पेजवर 'Ask SRK' सेशन ठेवत