मुंबई : बॉलीवूडमधील अभिनेता पंकज त्रिपाठी याची आई हेमवंती देवी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्या ८९ वर्षांच्या होत्या. हेमवंती देवी यांनी बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड या त्यांच्या मूळ गावी अखेरचा श्वास घेतला. या प्रसंगी पंकज त्रिपाठी हेमवंती देवीं जवळ उपस्थित होते.
पंकज त्रिपाठी हे मूळचे बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील असून सध्या ते मुंबईत आपल्या कारकिर्दीत व्यस्त आहेत. त्यांचे आई-वडील मात्र गावातच वास्तव्यास होते. पंकज यांच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. वडील हे शेतकरी होते आणि त्यांना मुलाच्या अभिनय कारकिर्दीत विशेष रस नव्हता, असे पंकज यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
अभिनेता पंकज त्रिपाठी यांचे बालपण गोपालगंज येथेच गेले. त्यांचे पुढील शिक्षण पाटणा येथे झाले. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि मेहनतीच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले.






