बाजारात अजूनही दोन हजार रूपयांच्या नोटा, RBI ने दिली धक्कादायक माहिती



नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा २०००च्या नोटा चर्चेचा विषय ठरत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नुकताच अहवाल जारी करत मोठा खुलासा केला आहे की, नोटबंदी-सदृश निर्णयाला दीड वर्ष उलटले असतानाही अजूनही तब्बल ५८१७ कोटी मूल्याच्या २०००च्या नोटा बाजारातून परत आल्या नाहीत.बहुतेक लोकांना वाटत होते की या नोटा पूर्णपणे चलनातून गायब झाल्या आहेत, मात्र आरबीआयच्या आकडेवारीने चित्र वेगळे दाखवले आहे.

रिझर्व्ह बँकेने शनिवारी जाहीर केलेल्या निवेदनात सांगितले की, १९ मे २०२३ रोजी दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय जाहीर झाला तेव्हा या नोटांची एकूण किंमत ३.५६ लाख कोटी रुपयांची होती. आता ती केवळ ५८१७ कोटी रुपये इतकीच उरली आहे. म्हणजेच आरबीआयच्या मते ९८.३७ टक्के या नोटा परत बँकिंग व्यवस्थेत जमा झाल्या आहेत. आरबीआयने स्पष्ट केले आहे की दोन हजारच्या नोटा अजूनही कायदेशीर चलन आहेत आणि व्यवहारात स्वीकारल्या जाऊ शकतात. मात्र या नोटांची छपाई बंद करण्यात आली असून बँका त्या पुन्हा जारी करणार नाहीत.

१९ मे २०२३ पासून आरबीआयच्या देशभरातील १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये या नोटा जमा किंवा बदलण्याची सोय करण्यात आली आहे. ९ ऑक्टोबर २०२३ पासून सामान्य जनतेसाठी ही प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात आली आहे. लोक आता इंडिया पोस्ट मार्फत देखील दोन हजार रूपयाच्या नोटा कोणत्याही आरबीआय कार्यालयात पाठवून आपल्या बँक खात्यात रक्कम जमा करू शकतात.

ही कार्यालये अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुवनंतपुरम येथे आहेत. आरबीआयने सांगितले की दोन हजारच्या नोटांच्या परतीच्या स्थितीबाबत तो वेळोवेळी अद्ययावत माहिती देत राहील.

आर्थिक तज्ञांच्या मते काही नोटा अजूनही ग्रामीण भागात किंवा रोख व्यवहारांवर आधारित व्यवसायांमध्ये अडकल्या असण्याची शक्यता आहे, तर काही लोकांनी या नोटा स्मृतीचिन्ह किंवा कलेक्शन म्हणून जपून ठेवल्या आहेत.

Comments
Add Comment

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील

Himachal Pradesh Avalanche : अटल बोगद्याजवळ हिमस्खलन; सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही

हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळ असलेल्या अटल टनल रोहतांगच्या टोकाजवळ हिमखंड कोसळल्याची घटना घडली आहे. दोन

Nitish Kumar : नितीश कुमार १० एप्रिल रोजी राज्यसभा सदस्यत्वाची घेणार शपथ

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेत प्रवेश करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्या शपथविधीची तारीखही

Google Gemma 4 : एआय क्षेत्रात गुगलचा मोठा धमाका; GPT-5 आणि Llama 4 ला तगडी स्पर्धा

मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google ने आपले अत्याधुनिक आणि ‘ओपन-सोर्स’ कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल Gemma 4

Pakistan Threatens To Target Kolkata : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली भारताला धमकी; कोलकाता शहर पाकिस्तानच्या टार्गेटवर?

- शाहीन ३ मिसाइलच्या जोरावर पाकिस्तानचा भारताला धमकी देण्याचा नाहक प्रयत्न मुंबई :

Odisha Earthquake: ओडिशात भूकंपाचे धक्के, लोक घरातून बाहेर धावले; दृश्य सीसीटीव्हीत कैद

ओडिशा: ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा भूकंप झाला, ज्यामुळे सर्वत्र घबराट पसरली. रात्री सुमारे