पुणे: पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचा प्रमुख आणि त्याचे इतर साथीदार सध्या तुरुंगात आहेत. तरीसुद्धा वनराज आंदेकरच्या खुनात आरोपी असलेल्या गायकवाड टोळीतील समीर काळेचा भाऊ गणेश काळेची काल कोंढव्यात हत्या करण्यात आली. गणेश काळेवर आंदेकर टोळीतील चार जणांकडून गोळबार करण्यात आला. तसेच कोयत्यानेही वार करण्यात आले. या प्रकरणाबाबत आंदेकर टोळीने तुरुंगात जाण्यापूर्वीच हत्येची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या प्रकरणात आणखी खून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वनराज आंदेकर प्रकरणात शस्त्र पुरवल्याप्रकरणी समीर काळे सध्या तुरुंगात आहे. वनराजच्या हत्येशी त्याचा थेट संबंध नसतानाही, केवळ आरोपीचे कुटुंब म्हणून आयुष कोमकरनंतर आता गणेश काळेची हत्या करण्यात आली आहे. वनराज आंदेकरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच आंदेकरांनी, गायकवाड कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचला असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या प्रकाराला आता आळा घातला जाणार असून या ...
आंदेकर कुटुंबातील सर्वांना अटक करण्यात आली असून, ते राज्यातील विविध तुरुंगांमध्ये आहेत. मात्र, तुरुंगात असूनही त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. बंडू आंदेकरने वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी वर्षभरात नियोजन केले होते. एका प्रकरणात अटक होईल हे गृहीत धरून, टोळीतील काही जणांवर पुढील जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत पुरवल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली.
या सर्व घटनांमुळे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, आयुष कोमकर खून प्रकरण आणि त्यानंतर दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांमध्ये टोळीप्रमुख बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर यांच्यासह २० हून अधिक जण तुरुंगात आहेत. त्यामुळे सध्या आंदेकर टोळी चालवतेय कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे.