डोक्याला पिस्तुल लावून भाविकांचे नऊ तोळे सोने लुटले

पाथर्डी : गावठी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत पाच ते सहा चोरट्यांनी नाशिक येथील भाविकांचे ९ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. ही घटना पाथर्डी तालुक्यात खांडगावजवळील आश्रम शाळेजवळ घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिक जिल्ह्यातील पवन सुखदेव खैरनार (३६ रा. साईकृपा अपार्टमेंट, जेलरोड, नाशिक) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यात म्हटले आहे की, पवन व त्यांचा भाऊ अमोल खैरनार लहान मुलांच्या कुटुंबासह किरायच्या टेम्पो ट्रॅव्हलने २८ ऑक्टोबरला तुळजापुर,अक्कलकोट,पंढरपुर,कोल्हापुर,जेजुरी देवस्थानला गेले होते. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता मढी येथेदेवदर्शनासाठी गेले. परतीच्या मार्गावर ९ वाजता त्रिभुवनवाडी, कौडगाव, जोहारवाडी रस्त्याने जात असताना खांडगाव येथील आश्रमशाळेजवळ पाठीमागून येत काही जणांनी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलसमोर लावली. त्यातून पाच ते सहा जण लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेऊन खाली उतरले. एकाने डोक्याला गावठी पिस्तुल लावून ठार मारण्याची धमकी दिली. गाडीत असणाऱ्या कुटुंबातील महिलांच्या अंगावरील कर्णफले, गंठण, अंगठी असा सुमारे पाऊणे नऊ तोळे सोन्याचे दागिने व रोख १६ हजार ५०० रुपये असा ऐवज बळजबरीने काढून घेतले.

आरडाओरड ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिक लोक घटनास्थळाकडे येत असल्याचे पाहताच चोरटे पसार झाले. पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत. तीन दिवसांपूर्वी गंठण हिसकावले दरम्यान, तीन दिवसांपूर्वी करंजी घाटाजवळ अज्ञात चोरट्यांनी दिपिका पालवे या महिलेच्या गळ्यातील १३ ग्रॅम सोन्याचे गंठण पळवले होते. तीन, चार दिवसापूर्वी करंजीजवळ गटाचे पैसे गोळा करणाऱ्या एका व्यक्तीस अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी मारहाण करुन त्याच्याजवळील पैशाची पिशवी हिसकावून नेली होती. मात्र, अशा घटनांचा तपास लागत नसल्याने पोलिसांविषयी नाराजीचे वातावरण आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळावरून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, दोन दुचाकी जप्त केल्या असून काही संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
Comments
Add Comment

‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ने मारली झेप; प्राइम व्हिडिओवरील टॉप अनस्क्रिप्टेड शो

मुंबई : भारताची आवडती एंटरटेनमेंट डेस्टिनेशन असलेल्या प्राइम व्हिडिओने आपल्या अनस्क्रिप्टेड ओरिजिनल

विरारमध्ये ११ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू; पालिकेच्या गार्डनमध्ये दुर्घटना

विरार : विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या गार्डनमधील तलावात खेळता खेळता पाय घसरल्याने ११

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रविवारपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका, कोण मारणार बाजी ?

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी जिंकली. दोन्ही

ज्ञानोबा माऊलीचे कार्य स्टॅण्डफोर्ड विद्यापीठात

मुंबई : सर्व समाजासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडणाऱ्या ज्ञानोबा माऊली यांचे कार्य साता समुद्रापार स्टॅण्डफोर्ड

नायगाव बीडीडीवासीयांचा गृहप्रवेश लांबणीवर

८६४ रहिवाशांना घरांची प्रतीक्षा मुंबई  : वरळी बीडीडीच्या साडेपाचशे रहिवाशांना घराचा ताबा दिल्यानंतर आता

रेल्वेमध्ये ‘हलाल’ प्रमाणित अन्न विकण्याची अधिकृत तरतूद नाही

'एनएचआरसी'च्या नोटिसीला भारतीय रेल्वे बोर्डाचे स्पष्टीकरण नवी दिल्ली  : रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या