मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहेतच. याच रील्स मुळे अनेकांना प्रसिद्धी मिळते आणि ते चर्चेत येतात. मग ते हिंदी मराठी चित्रपटांच्या प्रीमिअर शोला सुद्धा अनेकवेळा आलेले दिसतात. त्यातल्याच काही जास्त फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएन्सर्सना अनेकदा चित्रपटात किंवा मालिकेमध्ये काम दिलं जात. याचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. यामुळे अभिनय क्षेत्रात असलेल्या कलाकारांना कामाच्या संधी मिळत नाहीत. अनेक दिग्गज कलाकार याबद्दल मत व्यक्त करतात. आता एका मराठी कलाकाराने याबद्दल आपले मत परखडपणे मांडले आहे. मराठी अभिनेता अजिंक्य जोशीने अनेक गाजलेल्या सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अजिंक्य जोशी याने त्याचे परखड मत मांडले आहे. अजिंक्य जोशी म्हणले की 'अनेकदा असं झालंय की स्बस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स बघून अनेकांना कास्ट केलं आणि ज्यांनी कास्ट केलं ते आणि ज्यांचं कास्टिंग झालं ते सुद्धा तोंडघशी पडले आहेत. जे रील्सस्टार म्हणतात ना ! मला ३० सेकंद द्या, ला येते अॅक्टिंग अरे पाठांतराचं काय ? भाषेचं काय ? तुम्ही फक्त लिपसिंग करताय समोरचा जे बोलतोय त्यावर. तुमच्या भाषेचं काय ? बाकीच्या एक्सरसाईझचं काय ? स्पष्ट बोलण्याकरता काय करावं हे माहित नसतं त्यांना. यामुळे ते तोंडघशी पडतात' असं मत अजिंक्य जोशीने परखडपणे मांडले आहे.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेनंतर मी एका मालिकेसाठी, सावंतवाडीला शूटिंगसाठी गेलो होतो. आता सगळंच बदलत चाललंय, छोट्या गोष्टींसाठी काही कलाकारांना अव्हॉइड केलं जात. माझं आधीचं काम बघून मला पुढची कामं मिळत गेली. पण आता असं झालंय की मोठ-मोठया कलाकारांनाही ऑडिशन द्यावी लागते. मी नाही मानत स्वतः ला मोठा, पण असं झालंय; असंही अजिंक्य जोशी म्हणाला. अजिंक्य जोशी याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यानं ' ह. म. बने तू. म. बने, 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', '४०५ आनंदवन, ' मेहंदी है रचनेवली' , 'बेधुंद' , यांसारख्या गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये त्याबरोबर चित्रपटांमध्येही काम केलं आहे.