सिक्कीममध्ये हिमवृष्टी! झारखंड आणि उत्तर बंगालमध्ये अतीवृष्टी होण्याची शक्यता, खराब वातावरणामुळे अर्थमंत्र्यांनी रद्द केला भूतान दौरा

सिक्कीम: भारत-चीन सीमेवर झालेल्या मुसळधार हिमवृष्टीमुळे सिक्कीममधील तापमानात मोठी घट झाली आहे. हिमवृष्टीमुळे अनेक भागात पारा शून्याखाली गेला आहे. ज्याचा परिणाम सिक्कीममधील जनजीवनावर झाला असून हवामान खात्याने पुढील २४ तासांत सिक्कीममधील हवामान आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवली आहे. यासाठी सिक्कीममध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


सिक्कीममध्ये जारी करण्यात आलेल्या रेड अलर्टमध्ये पर्यटकांना उंचावरील भागात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर सीमा रस्ते संघटनेचे पथक बर्फ हटवण्यासाठी सतत काम करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा हवामान बदलाचा परिणाम असू शकतो. कारण, अशी हिमवृष्टी सहसा नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरू होते.


हवामान विभागाने आजपासून पुढील दोन दिवस अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानुसार, तवांग, पश्चिम कामेंग, लोअर सुबानसिरी आणि अंजाव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोअर दिबांग व्हॅलीच्या काही भागातही वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.




झारखंडमध्ये सुद्धा पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने १३ जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी केला आहे. तर उत्तर बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे . चक्रीवादळ मोंथाच्या प्रभावामुळे, पुढील २४ तासांत उत्तर बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की अलीपूरद्वार, कूचबिहार, जलपाईगुडी, कालिम्पोंग आणि दार्जिलिंग जिल्ह्यांमध्ये वादळासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.


खराब हवामानामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा भूतानचा अधिकृत दौरा रद्द करण्यात आला आहे. सीतारमण ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान भारत आणि भूतानमधील आर्थिक संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने भूतानला भेट देणार होत्या. या चार दिवसांच्या दौऱ्यात त्या आर्थिक व्यवहार विभागाच्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार होत्या.

Comments
Add Comment

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या

नवीन कामगार कायद्यांमुळे वेतन कमी होणार नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायदे लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होईल, अशी चिंता सध्या

पश्चिम बंगालमध्ये ५८.८ लाख मतदारांची नावे यादीतून वगळणार

कोलकाता : २०२६ पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार