सिक्कीम: भारत-चीन सीमेवर झालेल्या मुसळधार हिमवृष्टीमुळे सिक्कीममधील तापमानात मोठी घट झाली आहे. हिमवृष्टीमुळे अनेक भागात पारा शून्याखाली गेला आहे. ज्याचा परिणाम सिक्कीममधील जनजीवनावर झाला असून हवामान खात्याने पुढील २४ तासांत सिक्कीममधील हवामान आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवली आहे. यासाठी सिक्कीममध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिक्कीममध्ये जारी करण्यात आलेल्या रेड अलर्टमध्ये पर्यटकांना उंचावरील भागात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर सीमा रस्ते संघटनेचे पथक बर्फ हटवण्यासाठी सतत काम करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा हवामान बदलाचा परिणाम असू शकतो. कारण, अशी हिमवृष्टी सहसा नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरू होते.
हवामान विभागाने आजपासून पुढील दोन दिवस अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानुसार, तवांग, पश्चिम कामेंग, लोअर सुबानसिरी आणि अंजाव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोअर दिबांग व्हॅलीच्या काही भागातही वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
खगोलप्रेमींसाठी (Astronomy Enthusiasts) या नोव्हेंबर महिन्यात एक आनंदाची आणि खास खगोलीय घटना घडणार आहे. या महिन्यातील पौर्णिमेला 'बीव्हर मून' (Beaver Moon) म्हणून ओळखले ...
झारखंडमध्ये सुद्धा पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने १३ जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी केला आहे. तर उत्तर बंगालसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे . चक्रीवादळ मोंथाच्या प्रभावामुळे, पुढील २४ तासांत उत्तर बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की अलीपूरद्वार, कूचबिहार, जलपाईगुडी, कालिम्पोंग आणि दार्जिलिंग जिल्ह्यांमध्ये वादळासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.
खराब हवामानामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा भूतानचा अधिकृत दौरा रद्द करण्यात आला आहे. सीतारमण ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान भारत आणि भूतानमधील आर्थिक संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने भूतानला भेट देणार होत्या. या चार दिवसांच्या दौऱ्यात त्या आर्थिक व्यवहार विभागाच्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार होत्या.






