मोठी बातमी - जीएसटीची दिवाळी संपली आता 'गॅसची' दिवाळी व्यवसायिक गॅस सिलेंडरमध्ये दरकपात

प्रतिनिधी:व्यवसायिक एलपीजी गॅसच्या किंमतीत सरकारने कपात केली आहे. आज १ नोव्हेंबरपासून हे दर लागू झाल्याने प्रति १९ किलो व्यवसायिक गॅस सिलेंडरमध्ये ५ रूपयांची घसरण झाली आहे. जागतिक गॅसच्या अनुषंगाने सरकार घरगुती गॅसच्या किंमतीचे वेळोवेळी पुनरावलोकन करत असते. याच प्रकियेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय गॅस दरात काहीशी स्थिरता प्राप्त झाल्याने घरगुती गॅस आज स्वस्त झालै आहेत. त्यामुळे देशातील प्रमुख शहरात व्यवसायिक गॅस (Commercial Gas) किंमतीत बदल झाले आहेत.


त्यामुळे मुंबईत व्यवसायिक १९ किलो गॅसचे दर ५ रूपयाने कपात झाल्याने १५४२ रूपयांवर पोहोचले आहेत. घरगुती गॅसच्या किंमतीत कुठलाही बदल झालेला नाही. खरं तर ऑक्टोबर महिन्यात व्यवसायिक गॅसच्या किंमतीत १५.५० रूपयांनी वाढ झाली होती. या महिन्यात मात्र ५ रूपयांनी कपात झाली आहे.


मात्र यापूर्वी गॅसच्या किंमती सलग सहा वेळा कमी करण्यात आल्या होत्या. एकूण २२३ रूपयांनी एप्रिलपासून गॅसच्या दरात कपात करण्यात आली होती. यावेळी व्यवसायिक गॅस सिलेंडरमध्ये कपात झाली असली तरी घरगुती गॅसमध्ये कपात न केल्याने दर 'जैसे थे' राहणार आहेत. सध्या मुंबईत घरगुती गॅसचा दर १९ किलोमागे ८५२.५० रूपयांवर कायम आहे.


गेल्या १२ महिन्यांत, एलपीजीच्या किमतीत वाढ होत आहे. डिसेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत ५० रुपयांची वाढ झाली आहे. एप्रिल २०२५ मध्ये ५० रुपयांची सर्वात मोठी वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेसाठी 'आप'ची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी आम आदमी पार्टीने अर्थात 'आप'ने ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राज्य

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या

मुंबईत राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई महापालिका

स्मृती मानधनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी झेप

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा

WhatsApp वरच प्रोफेशनल फोटो एडिटिंग; स्टेटस एडिटरमध्ये मेटा AI टूल्सची चाचणी सुरू

कॅलिफोर्निया : WhatsApp वापरकर्त्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता कोणतेही वेगळे अ‍ॅप न वापरता WhatsApp वरच प्रोफेशनल

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.