रोहित आर्याने "या" मराठी अभिनेत्रीलाही केले होते मेसेज ; अभिनेत्रीने शेअर केले स्क्रीनशॉट

मुंबई : काल पवईत एक हादरवणारी गोष्ट घडली. रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने शस्त्राचा धाक दाखवत १७ मुलं आणि दोन नागरिक यांना ओलीस ठेवले. ओलीस ठेवलेल्यांच्या सुटकेच्या बदल्यात विशिष्ट व्यक्तींशी भेटण्याची आणि बोलण्याची संधी मिळावी अशी त्याची आग्रही मागणी होती. पोलिसांनी प्रसंगावधान राखून अग्निशमन दलाच्या मदतीने कारवाई केली आणि ओलीस ठेवलेल्यांची सुटका केली. यावेळी रोहितकडे असलेल्या शस्त्रामुळे धोका असल्याची जाणीव होताच पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात गंभीररित्या जखमी झालेल्या रोहितचा थोड्या वेळाने मृत्यू झाला. या प्रकरणात आता नवी धक्कादायक माहिती उजेडात येत आहे.


रोहितने नवा चित्रपट करत असल्याचे सांगत अनेक चित्रपट कलाकारांशी संपर्क केला होता. याच संदर्भात एका मराठी अभिनेत्रीने धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. रोहितने घटनेच्या महिन्याभरापूर्वी संपर्क साधला होता. ही माहिती देत अभिनेत्रीने रोहित सोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.


एका नव्या चित्रपटाविषयी बोलायचे आहे, असे सांगून रोहित रुचिताशी संपर्कात होता. रोहित आर्यने अभिनेत्री रुचिता जाधवला ४ ऑक्टोबर रोजी फोन केला होता. नंतर रोहितने रुचिताला २८ ऑक्टोबर रोजी आर ए स्टुडिओ येथे भेटण्यासाठ बोलावले होते.


रुचिताने तिच्या स्टोरी मध्ये लिहिलं की 'मला सगळ्यांसोबत काहीतरी वैयक्तिक शेअर करायचे आहे ज्यामुळे मी खूप हादरले आहे, ४ ऑक्टोबर रोजी मला रोहित आर्या या व्यक्तीचा मेसेज आला सिनेमा कश्यासंबंधी आहे? असे विचारले असता , काही मुलांना ओलीस ठेवण्याचा सीन असल्याचे त्याने सांगितले. सीन ऐकून मी ते काम करण्यासाठी तयार झाले होते. २३ ऑक्टोबर रोजी त्याने मला कधी भेटायचं विचारलं, आणि २७ ऑक्टोबर रोजी त्याने मला पवईच्या 'आरए स्टुडिओच लोकेशन पाठवलं. पण माझ्या घरी काही इमर्जन्सी असल्याने मला जाणे शक्य झाले नाही. मी ही बातमी पाहिली तेव्हा मला धक्का बसला. मी या घटनेच्या किती जवळ असणार होते हा विचार करूनच मी अस्वस्थ होत आहे. यातून एकच कळतं की आपण कोणाला भेटतो हे आधी नीट बघायला हवं. सुरक्षित राहा, Instinct वर विश्वास ठेवा आणि जिथे जाल तिथल्या लोकेशनची माहिती आधीच कुटुंबातील सदस्याला किंवा मित्रपरिवाराला देऊन ठेवा.' रुचिताच्या या खुलाश्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे.

Comments
Add Comment

शिरगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार मोहिमेचा धडक्यात शुभारंभ

कार्यकर्त्यांचा एकजुटीने मोठ्या विजयाचा निर्धार शिरगांव : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या

प्रजासत्ताक दिनाला जोडून सुट्ट्यांमुळे महाराष्ट्र, गोव्यातील बस आरक्षणात वाढ

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या लाँग विकेंडमुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील आंतरशहरी बस प्रवासात लक्षणीय वाढ होत

नवी मुंबईच्या महापौरपदाचा आज निर्णय?

६६ नगरसेवक आज मुख्यमंत्र्यांना भेटणार नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला

ठाण्यात १२ दिवस टप्प्याटप्प्याने पाणीकपात

विविध भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार ठाणे : ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा

एका महिन्यात ९०० कुत्र्यांची हत्या

तेलंगणा : तेलंगणामधील जगतियाल जिल्ह्यातील पेगाडपल्ली गावात सुमारे ३०० भटक्या कुत्र्यांना मारण्यात आले आहे. या

भारत स्वत:चे अंतराळ स्थानक उभारणार !

पहिले घटक २०२८ मध्ये अंतरिक्षात नवी दिल्ली : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो) देशासाठी अत्यंत