माजी कर्णधार अझरुद्दीन झाला तेलंगणा सरकारचा मंत्री


हैदराबाद : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांनी तेलंगणा मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी राजभवन येथे अझरुद्दीन यांना शपथ दिली. अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश करुन तेलंगणा सरकारने दीर्घकाळापासून रिक्त असलेली मंत्रिमंडळातील एक रिक्त जागा भरली. तसेच सरकारमध्ये मुसलमानांचे प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा सहभागी करुन घेतला.


ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात ११ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या मतदारसंघात ३० टक्के मुसलमान मतदार आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणातील काँग्रेस सरकारने अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश केला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.


अझरुद्दीनने काँग्रेसच्या तिकिटावर ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात २०२३ मध्ये निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भारत राष्ट्र समितीच्या मगंती गोपीनाथ यांच्याकडून अझरुद्दीन यांचा पराभव झाला होता. पण मगंती गोपीनाथ यांचे ८ जून २०२५ रोजी निधन झाले. यामुळे रिक्त झालेल्या ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात ११ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी वल्लाळ नवीन यादव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे त्याचवेळी अझरुद्दीन यांना काँग्रेसने मंत्री केले आहे. अझरुद्दीन सध्या आमदार नाही त्यामुळे शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांत त्यांना आमदार व्हावे लागेल नाही तर मंत्रि‍पदावर पाणी सोडावे लागणार आहे. सत्ताधारी काँग्रेसने अझरुद्दीन यांच्या नावाची शिफारस विधान परिषदेच्या आमदारकीसाठी केली आहे. पण राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याकडून शिक्कामोर्तब झालेले नाही.


Comments
Add Comment

शरद पवार गटाच्या सूर्यकांत मोरेंकडून विधिमंडळ सभागृहाचा अवमान

मुंबई : शरद पवार गटाचे सूर्यकांत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे झालेल्या सभेत

चेंबूरमध्ये देवीच्या मूर्तीला ‘मदर मेरी’चे वस्त्र; धार्मिक भावनांना धक्का, पुजारी दोन दिवस पोलिस कोठडीत

मुंबई : मुंबईच्या चेंबूर परिसरात एका मंदिरात घडलेल्या विचित्र घटनेने मोठा धार्मिक वाद निर्माण केला आहे. वाशी

बॉलिवूड ड्रग प्रकरण ; सिद्धांत कपूरची ANC कडून चौकशी

मुंबई : बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा ड्रग्ज सिंडिकेटचे सावट गडद होताना दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात पालवे कुटुंबियांचे गंभीर आरोप; पोस्टमॉर्टेम व तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणात खुलासे

टी-२० विश्वचषक २०२६चे वेळापत्रक जाहीर, १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान सामना

दुबई : आयसीसीने २०२६ च्या पुरुष टी-२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले असून, भारताचा पहिला सामना ७