वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती

विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन


मुंबई : वसई विरार महापालिका क्षेत्रातील १३ मुख्य रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करण्याच्या कामास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने गती द्यावी, असे निर्देश वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.


कामास मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) वसई विरार महापालिका हद्दीत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासंदर्भात मंत्री नाईक यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी एमएमआरडीएचे सहआयुक्त ए.के. पांडे, वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोज सुर्यवंशी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, एमएमआरडीएचे मुख्य अभियंता यतिन साखळकर, महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रदीप पाचंगे आदी उपस्थित होते.


वसई विरार महापालिका क्षेत्रात एमएमआरडीएमार्फत तेरा मुख्य रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणाचे काम करण्यात येत आहे. सिमेंटच्या रस्त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ व जलदगतीने होणार आहे. त्यामुळे या कामास प्राधान्य देऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे. तसेच महापालिका क्षेत्रातील उड्डाणपुलांची कामेही वेगाने कराव्यात, अशा सूचना मंत्री नाईक यांनी यावेळी दिल्या.


तसेच विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन आहे. या रेल्वे उड्डाणपुलाचे काम एमएमआरडीएने लवकर सुरू करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता