गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत यांचं नेमकं चाललंय तरी काय?

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात सध्या एक नव्या जोडीची चर्चा रंगली आहे ‘इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत आणि लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील. दोघेही पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.


‘बिग बॉस मराठी सीझन ५’ मध्ये झळकलेला लोकप्रिय गायक अभिजीत सावंतची लोकप्रियता सध्या खूप वाढली आहे. अभिजीत सध्या सतत नवीन गाण्यांवर आणि प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. त्याने अलीकडेच काही अल्बम्स रिलीज केले असून, चाहत्यांकडून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.


आता अभिजीत सावंत आणि महाराष्ट्रातील चर्चेत असलेली नृत्यांगना गौतमी पाटील या दोघांच्या जोडीबद्दल बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघे लवकरच एका नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत, अशी जोरदार चर्चा सुरु आहे.


या चर्चेचं कारण ठरली आहे गौतमी पाटीलची इन्स्टाग्राम पोस्ट. तिने नुकताच अभिजीत सावंतसोबतचा एक फोटो शेअर केला असून, त्याला ‘NEW’ असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये दोघेही आनंदात हसताना दिसतात. त्यामुळे चाहते आता दोघं एकत्र कोणत्या प्रोजेक्टसाठी काम करत आहेत, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.


https://www.instagram.com/p/DQa6BarjBPb/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

गौतमी पाटील सध्या महाराष्ट्रभर स्टेज शोमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तिने काही चित्रपटांमध्येही काम केलं असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटात तिचं आयटम सॉन्ग ‘दिसला गं बाई दिसला 2.0’ चर्चेत आलं होतं. तसेच ती ‘सोनचाफा’ आणि ‘आई गोंधळाला ये’ अशा म्युझिक व्हिडिओंमध्येही झळकलेली आहे.


तर अभिजीत सावंतच्या ‘प्रेमरंग सनेडो’ आणि ‘चाल तुरू तुरू’ यांसारख्या गाण्यांना प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. त्याने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमातही सहभाग घेतला होता.


आता अभिजीत आणि गौतमी या दोघांचा एकत्रित प्रोजेक्ट नेमका कसा असेल, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. चाहत्यांमध्ये याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Comments
Add Comment

हाय-प्रोफाइल लग्नातही करण जोहर जेवत नाही; कारण ऐकून बसाल थक्क

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर आपल्या चित्रपटांसोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही

दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार मुंबई: हिंदीमधील अजरामर

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत