प्रत्येक कॉलवर दिसणार कॉलर चे खरे नाव, TRAI चा SNAP ला हिरवा झेंडा

नवी दिल्ली : आता प्रत्येक कॉल वर केवळ नंबरच नाही तर कॉल करणाऱ्याचे नाव पण दिसणार आहे. ही सेवा सरसकट सर्व मोबाईल धारकांना मिळणार आहे. यामुळे स्पॅम करणाऱ्यांना आळा घालण्यास मदत होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI ) कॉलरचे नाव दाखवणाऱ्या calling name presentation (CNAP) सेवेला मंजुरी दिलेली आहे. आता मोबाईल धारकांना केवळ नंबरच नाही तर कॉल करणाऱ्याचे नाव देखील मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार आहे.

काय असेल CNAP सेवा ?

CNAP अर्थात Calling Name Presentation या तंत्राने जेव्हा कोणी तुम्हाला कॉल करेल त्यावेळी तुमच्या मोबाईलवर त्या व्यक्तीचे रजिस्टर्ड नाव नंबरसह दिसणार आहे. याचा मुख्य हेतू हा स्पॅमला आळा घालणे हा आहे. मोबाईलधारकांना कॉलर्सची ओळख कळताच कॉल रिसिव्ह करावा की करू नये याचा निर्णय घेणे सोपे होणार आहे. तसेच मोबाईलधारकांची अज्ञात नंबरवरुन येणाऱ्या कॉलपासून सुटका होणार आहे.

TRAI आणि DoT चा मोठा निर्णय

टेलिकॉम रेग्युलेटर TRAI आणि Department of Telecommunications (DoT) यांनी संयुक्तपणे निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे  आता प्रत्येक कॉल वर केवळ नंबरच नाही तर कॉल करणाऱ्याचे नाव पण दिसणार आहे. ही सेवा सरसकट सर्व मोबाईल धारकांना मिळणार आहे. या सेवेचा वापर करायचा आहे की नाही हे ठरवण्यासाठी मोबाईलधारकांना पर्याय मिळणार आहे.

कोणत्या नेटवर्कवर सुरू होणार सेवा ?

सुरवातीला ही सेवा 4G आणि 5G नेटवर्कवर लागू होणार आहे. 2G आणि 3G नेटवर्कवर हिला तांत्रिक अपग्रेड केल्यांनतर सुरू केले जाणार आहे. नवीन मोबाईल डिव्हाईसमध्ये CNAP सपोर्टला अनिवार्य बनवण्याची तयारी सुरू आहे.

काय होणार फायदा ?

1. फ्रॉड कॉल्सवर अंकुश : आता कोणत्याही बोगस वा खोट्या कॉलरपासून फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी होईल.

2. मोबाईल धारकांची सुरक्षा: कॉलरचे नाव पाहून कॉल घ्यायचा की नाही ते ठरवता येणार आहे.

3. बिझनेस कॉल्समध्ये पारदर्शकता : कंपन्या आपल्या खऱ्या ब्रँडच्या नावाने कॉल करु शकतील. त्यामुळे ग्राहक विश्वास ठेवू शकतील.

गुप्ततेवर प्रश्नचिन्ह ?

काही तज्ज्ञांनी यावर आक्षेप घेतला आहे. कॉलरचे नाव दाखवल्याने प्रायव्हसीवर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पण ट्रायचे म्हणणे आहे की ही माहिती कॉलरच्या नेटवर्क डेटाबेसमधून घेतली जाईल, अनेक अॅप किंवा थर्ड पार्टीकडून कडून घेतली जाणार नाही.

कोणाला करावी लागणार तयारी ?

TRAI च्या आदेशानंतर आता टेलिकॉम कंपन्या आणि मोबाईल निर्माता कंपन्या यांना या सेवेच्या अनुरुप तंत्रात बदल करावा लागणार आहे. सरकार लवकरच याची अंतिम रुपरेषा ठरवणार आहे.
Comments
Add Comment

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी