प्रत्येक कॉलवर दिसणार कॉलर चे खरे नाव, TRAI चा SNAP ला हिरवा झेंडा

नवी दिल्ली : आता प्रत्येक कॉल वर केवळ नंबरच नाही तर कॉल करणाऱ्याचे नाव पण दिसणार आहे. ही सेवा सरसकट सर्व मोबाईल धारकांना मिळणार आहे. यामुळे स्पॅम करणाऱ्यांना आळा घालण्यास मदत होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI ) कॉलरचे नाव दाखवणाऱ्या calling name presentation (CNAP) सेवेला मंजुरी दिलेली आहे. आता मोबाईल धारकांना केवळ नंबरच नाही तर कॉल करणाऱ्याचे नाव देखील मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणार आहे.

काय असेल CNAP सेवा ?

CNAP अर्थात Calling Name Presentation या तंत्राने जेव्हा कोणी तुम्हाला कॉल करेल त्यावेळी तुमच्या मोबाईलवर त्या व्यक्तीचे रजिस्टर्ड नाव नंबरसह दिसणार आहे. याचा मुख्य हेतू हा स्पॅमला आळा घालणे हा आहे. मोबाईलधारकांना कॉलर्सची ओळख कळताच कॉल रिसिव्ह करावा की करू नये याचा निर्णय घेणे सोपे होणार आहे. तसेच मोबाईलधारकांची अज्ञात नंबरवरुन येणाऱ्या कॉलपासून सुटका होणार आहे.

TRAI आणि DoT चा मोठा निर्णय

टेलिकॉम रेग्युलेटर TRAI आणि Department of Telecommunications (DoT) यांनी संयुक्तपणे निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे  आता प्रत्येक कॉल वर केवळ नंबरच नाही तर कॉल करणाऱ्याचे नाव पण दिसणार आहे. ही सेवा सरसकट सर्व मोबाईल धारकांना मिळणार आहे. या सेवेचा वापर करायचा आहे की नाही हे ठरवण्यासाठी मोबाईलधारकांना पर्याय मिळणार आहे.

कोणत्या नेटवर्कवर सुरू होणार सेवा ?

सुरवातीला ही सेवा 4G आणि 5G नेटवर्कवर लागू होणार आहे. 2G आणि 3G नेटवर्कवर हिला तांत्रिक अपग्रेड केल्यांनतर सुरू केले जाणार आहे. नवीन मोबाईल डिव्हाईसमध्ये CNAP सपोर्टला अनिवार्य बनवण्याची तयारी सुरू आहे.

काय होणार फायदा ?

1. फ्रॉड कॉल्सवर अंकुश : आता कोणत्याही बोगस वा खोट्या कॉलरपासून फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी होईल.

2. मोबाईल धारकांची सुरक्षा: कॉलरचे नाव पाहून कॉल घ्यायचा की नाही ते ठरवता येणार आहे.

3. बिझनेस कॉल्समध्ये पारदर्शकता : कंपन्या आपल्या खऱ्या ब्रँडच्या नावाने कॉल करु शकतील. त्यामुळे ग्राहक विश्वास ठेवू शकतील.

गुप्ततेवर प्रश्नचिन्ह ?

काही तज्ज्ञांनी यावर आक्षेप घेतला आहे. कॉलरचे नाव दाखवल्याने प्रायव्हसीवर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पण ट्रायचे म्हणणे आहे की ही माहिती कॉलरच्या नेटवर्क डेटाबेसमधून घेतली जाईल, अनेक अॅप किंवा थर्ड पार्टीकडून कडून घेतली जाणार नाही.

कोणाला करावी लागणार तयारी ?

TRAI च्या आदेशानंतर आता टेलिकॉम कंपन्या आणि मोबाईल निर्माता कंपन्या यांना या सेवेच्या अनुरुप तंत्रात बदल करावा लागणार आहे. सरकार लवकरच याची अंतिम रुपरेषा ठरवणार आहे.
Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

Stock Market Update: दिवाळी अभ्यंगस्नानानंतर शेअर बाजार सत्रात जबरदस्त वाढ बँक निफ्टी नव्या उच्चांकावर सेन्सेक्स व निफ्टी 'इतक्याने' उसळला 'या' कारणामुळे

मोहित सोमण: जागतिक स्थैर्याच्या संकेतासह मजबूत चीनच्या आकडेवारीमुळे आज वैश्विक व आशियाई शेअर बाजारात वाढ झाली

‘दीपशृंखला उजळे अंगणा,

विशेष : ऋतुजा राजेश केळकर ‘दीपशृंखला उजळे अंगणा, आनंदाची वृष्टी होई। स्नेहसंबंध जुळती नव्याने, प्रेमाची गंध

तणाव वाढला, तैवान जवळ पोहोचला चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा

तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...! महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात

itel A90 लिमिटेड एडिशन लाँच मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शनसह ७००० रूपयांत लाँच

MIL STD 810H - सह मिलिटरी-ग्रेड टफनेस आणि धूळ, पाणी आणि थेंब प्रतिरोधकतेचे 3P कंपनीकडून आश्वासन परवडणाऱ्या किमतीत