लग्नात नववधूने फक्त तीनच सोन्याचे दागिने परिधान करावे, पंचायतीचे निर्देश

उत्तराखंड : दिवसेंदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किमती या गगनाला भिडत आहेत. भारतीय परंपरेनुसार आपण बहुतेक सणांमध्ये, लग्नात दागिने घालतोच पण हल्ली दागिने खरेदी सर्व सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. हिच एकूण परिस्थिती लक्षात घेऊन भारतातील एका गावाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे दागिन्यांवर खर्च कमी होईल.


उत्तराखंड मधील अनुसूचित जनजाती क्षेत्र जौनसार भागातील एका पंचायतीनं सोडलेला हे फर्मान महिलांनी किती सोन्याचे दागिने घालावेत याबाबत आहे. या पंचायतीनं लग्न किंवा इतर समारंभात तीन पेक्षा जास्त सोन्याचे दागिने घालण्यावर बंदी घातली आहे.


महिलांनी सोन्याचे दागिने घालण्याबाबतचा हा नियम कंजाड आणि इंद्रोली गावात लागू करण्यात आला आहे. महिलांना कानातील झुमके, नाकातील नथ आणि मंगळसूत्र हे तिचे सोन्याचे दागिने घालण्याची सवलत देण्यात आली आहे. दोन गावांच्या संयुक्त पंचायतीनं या नियमांचं उल्लंघन करण्याऱ्या संबंधित व्यक्तीला ५० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. दरम्यान कंदाड येथील रहिवासी असलेल्या अर्जुन सिंह यांनी सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.


लग्न आलं की महिला सोन्याच्या दागिन्यांचा आग्रह धरतात. पण सोन्याचे दार गगनाला भिडले आहेत. त्यामुळे कुटुंबात वाद होऊ नये यासाठी पंचायतीने विचारपूर्वक दागिन्यांवर बंधन आणणारा निर्णय घेतला आहे. पंचायत लग्नातील इतर खर्च आणि मद्य अर्थात दारूवर होणारा खर्च यावर नियंत्रण आणण्याबाबतही विचार करत आहे. अनेक महिलांनी पंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव