सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात या सेमी फायनल सामन्यासाठी संघात दोन मोठे बदल केले. यावेळी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी विशेष लक्ष वेधून घेतले. दोन्ही संघांच्या सर्व खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. याचं कारण नेमकं आहे तरी काय ते पाहा...


यामागील कारण म्हणजे १७ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बेन ऑस्टिनला श्रद्धांजली वाहणे. मेलबर्नमध्ये सराव सत्रादरम्यान मानेला आणि डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. दोन्ही संघांनी श्रद्धांजली वाहणं, दिवंगत बेन ऑस्टिनला आदर व्यक्त करण्यासाठी आहे. गुरुवारी निधन झालेला १७ वर्षीय बेन ऑस्टिन बॉलिंग मशीनसमोर फलंदाजीचा सराव करत असताना डोक्याला आणि मानेला चेंडू लागला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्यूने क्रिकेटची दुनिया हादरली आहे.


भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी अनेक बदल केले आहेत. प्रतिका रावल दुखापतीमुळे संघाबाहेर गेली. प्रतिका रावलच्या जागी आता संघात शेफाली वर्माचा समावेश करण्यात आला आहे. मागील सामना भारताचा बांगलादेशसोबत रंगला जो पावसामुळे नंतर रद्द करण्यात आला. त्याच सामन्यात प्रतिकाला गंभीर दुखापत झाली. क्रांती गौड आणि रिचा घोष यांच्या जागी हरलीन देओल आणि उमा छेत्री यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अंतिम सामन्यात एकूण दोन बदल केले आहेत. अ‍ॅलिसा हीली परतली आहे, तर मोलिनेक्सने वेअरहॅमची जागा घेतली आहे.



भारताचा संघ:


स्मृती मानधना, शेफाली वर्मा, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, राधा यादव, क्रांती गौड, एन श्री चरणी आणि रेणुका सिंग.



ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन:


अ‍ॅलिसा हिली (कर्णधार आणि यष्टीरक्षक), फोबी लिचफिल्ड, अ‍ॅलिसा पेरी, बेथ मूनी, अ‍ॅनाबेल सदरलँड, अ‍ॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, किम गार्थ, एलाना किंग आणि मेगन शट.

Comments
Add Comment

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील

Ben Austin Dies News : एक चेंडू, सराव आणि जीवन संपलं…भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी १७ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलिया : सध्या भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२०

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वूमन्स सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कोणाला मिळणार ? जाणून घ्या नियम

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ ची दुसरी सेमी फायनल आज नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये

भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या T- २० मॅच च्या आधी वाईट बातमी, युवा खेळाडूचा बॉल लागून मृत्यू

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कांगारूं विरुद्ध पाच टी - २० सामन्यांची मालिका खेळत आहे. या

Shreyas Iyer Health Update : 'स्टार बॅट्समन' श्रेयस अय्यरकडून मोठी अपडेट! गंभीर दुखापतीनंतर ICU मधून भावनिक पोस्ट, चाहत्यांना दिलासा!

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज (Star Batsman) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या एका गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे.

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या