सरकारी रुग्णालयात आता रोज वेगळ्या रंगांच्या चादरी

सुरक्षित उपचार, स्वच्छतेचा नवा आराखडा तयार


मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयात स्वच्छतेच्या दृष्टीने रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी तसेच संक्रमणजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी आता रुग्णालयांमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांच्या बेडशीट्सचा वापर केला जाणार आहे. यामुळे वापर झालेली बेडशीट लगेच ओळखता येणार असून, रुग्णालयातील स्वच्छतेचे निरीक्षण सोपे होणार आहे.
या योजनेंतर्गत सोमवारी आणि गुरुवारी पांढरी, मंगळवारी आणि शुक्रवारी हिरवी तर बुधवारी आणि शनिवारी गुलाबी रंगाची बेडशीट वापरली जाणार आहे. रंगानुसार नोंदी ठेवल्याने जुन्या व नवीन बेडशीटची ओळख त्वरित होईल. त्यामुळे पुनर्वापर किंवा दुर्लक्ष होण्याची शक्यता टळेल. त्यामुळे रुग्णाला होणार संसर्ग टाळण्यास मदत मिळणार आहे.


कुठल्या दिवशी बेडशीटचा कोणता रंग?


पांढरा : सोमवार व गुरुवार
हिरवा : मंगळवार व शुक्रवार
गुलाबी : बुधवार व शनिवार


संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाचा नवा उपक्रम


मानवी हस्तक्षेपाशिवाय कपडे धुतले जाणार!


मानवी हस्तक्षेपाशिवाय रुग्णालयातील सर्व कपडे यांत्रिक पद्धतीने धुतले जाणार आहेत. या पद्धतीमुळे स्वच्छता सुनिश्चित होईल. रुग्णांसाठी सुरक्षित वातावरण तयार होईल. तसेच संसर्गजन्य घटकांचा धोका आणखी कमी होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा सर्वत्र स्वागत होत आहे. रुग्णालयातील बेडशीट, उशांचे कव्हर, ब्लँकेट, पडदे, गणवेश, टॉवेल इत्यादी वस्त्रांची पूर्णतः यांत्रिक पद्धतीने निर्जतुक धुलाई केली जाणार आहे. रंगानुसार नोंदी ठेवल्याने जुन्या व नवीन बेडशीटची ओळख त्वरित होईल. त्यामुळे पुनर्वापर किंवा दुर्लक्ष होण्याची शक्यता टळणार आहे. प्रवाशांना त्याचा फायदा होईल.

Comments
Add Comment

पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर

फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात

काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण, महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत

पाकिस्तानच्या संसदेत सभापतींना रोख रक्कम मिळाली, १२ खासदारांनी १० नोटांसाठी उड्या मारल्या

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एक अजब घटना घडली. या घटनेवर हसावे की पाकिस्तानच्या खासदारांच्या

प्रकाश महाजन भाजपच्या वाटेवर? मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

नागपूर : मनसेतून नुकतेच बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस