दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक


मुंबई : यावर्षी दिवाळी हंगामात राज्य परिवहन (एसटी)ला तब्बल ३०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले आहे. त्याखालोखाल धुळे व नाशिक या विभागाचा क्रमांक आहे. चांगले उत्पन्न आणल्याबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


यावर्षी १८ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या दिवाळीच्या १० दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी ३० कोटी याप्रमाणे तब्बल ३०१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे दिवाळी सुट्टीच्या परतीच्या दिवशी २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळवून या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे. एसटीच्या ३१ विभागात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने आणले असून ते २० कोटी ४७ लाख रुपये आहे. त्याखालोखाल धुळे विभागाने १५ कोटी ६० लाख रुपये आणि नाशिक विभागाने १५ कोटी ४१ लाख रुपयांचा महसूल गोळा केला आहे. मागील वर्षीच्या दिवाळी हंगामापेक्षा यावर्षी महामंडळाने तब्बल ३७ कोटी रुपये उत्पन्न जास्त
मिळाले आहे.


यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल आणि मे हे दोन महिने वगळता गेली चार महिने एसटी महामंडळाला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थिती यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महामंडळाला सुमारे १५० कोटीपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला; परंतु ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा हंगाम व सुट्ट्यांच्या कालावधीमुळे उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे प्रतिदिन ३४ कोटी रुपये याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात १,०४९ कोटी रुपयाचे उत्पन्न मिळविण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले होते.


तोट्यात राहणाऱ्या विभागांचे योग्य मूल्यमापन गरजेचे


तथापि, ऐन दिवाळीच्या काही मोजके दिवस सोडता दैनंदिन लक्ष गाठण्यात महामंडळाला शक्य झाले नाही. पुणे, बीड, अहिल्यानगर, अमरावती, बुलडाणा या विभागांनी मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीमध्ये चांगले उत्पन्न आणण्याचा प्रयत्न केला; परंतु सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव यासारख्या विभागांनी मात्र अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळे महामंडळाच्या एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते. निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा अत्यंत कमी उत्पन्न आणणाऱ्या विभागांच्या कामगिरीबाबत वरिष्ठ पातळीवर चिंता व्यक्त केली आहे. सातत्याने तोट्यात राहणाऱ्या विभागांचे योग्य मूल्यमापन होऊन त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्यासाठी एसटी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Comments
Add Comment

'पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा'

पुणे : पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) ताब्यातील जागा

राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा होणार उपलब्ध

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग

महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

मुंबई : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी

वसईत आयकर विभागाच्या धाडी, हॉटेल व्यवसायिकाच्या मालमत्तेची छाननी

वसई : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरू असताना वसईत आयकर विभागाने एका हॉटेल व्यावसायिकाच्या

Stocks to buy today: 'या' ५ शेअरला तज्ज्ञांकडून लघू व मध्यम कालावधीसाठी 'बाय कॉल' या शेअर्समधून चांगला परतावा अपेक्षित

शेअर बाजारात अस्थिरता व नफा बुकिंग सुरू असले तरी लघु व मध्यमकालीन चांगल्या परताव्यासाठी ब्रोकरेजने काही शेअर

सूरजच्या लग्नातील धमाल जान्हवीला भोवली, थेट रूग्णालयात दाखल! पोस्ट करत म्हणाली, नजर...

मुंबई: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचे २९ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्न झाले. सूरज चव्हाणच्या