मुंबई: टीव्ही जगतातील चर्चेत असलेली एकता कपूरची लोकप्रिय मालिका ‘क्यों की सास भी कभी बहू थी – सीझन 2’ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका टीआरपीच्या यादीत वरच्या स्थानावर असली तरी, आता अशी चर्चा आहे की ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
सोशल मीडियावरील एका फॅन पेजवरून ही माहिती समोर आली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की,या मालिकेचे केवळ २०० भाग प्रसारित होणार आहेत. एकता कपूरने मालिकेच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, जर प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, तरच मालिकेच्या भागांची संख्या वाढवली जाईल. मात्र, अपेक्षेइतकी लोकप्रियता न मिळाल्याने आता या मालिकेचा शेवट जवळ आल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज (Star Batsman) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या एका गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे. चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी ...
या बातमीमुळे मालिकेचे चाहते निराश झाले असून त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया भावनिक प्रतिक्रीया दिल्या आहेत. तर काही चाहत्यांनी म्हटले आहे की, कथा ताणून मालिका बिघडवण्यापेक्षा योग्य वेळी सुंदर शेवट करणे चांगले आहे. मालिकेच्या निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, ‘क्यों की सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा निरोप निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे.