फसव्या नोकरीच्या ऑफर वाढल्या; फेडएक्सचा जॉब सीकर्सना इशारा

विश्वासार्ह ब्रँड्सच्या नावांचा गैरवापर करून होते फसवणूक 


मुंबई:नोकरीच्या वाढत्या स्पर्धेत उमेदवारांना फसवणूक करणाऱ्या भरती योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन फेडएक्सने केले आहे. कंपनीने नोकरी शोधणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या ‘सायबर सेफ टिप्स’ शेअर करताना सांगितले की, फसवे लोक विश्वासार्ह ब्रँड्सची नावे गैरवापरून उमेदवारांना भुलवतात आणि अर्ज, प्रशिक्षण, व्हिसा प्रक्रिया किंवा मुलाखतीच्या नावाखाली पैसे उकळतात.नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलने “ऑनलाईन जॉब फ्रॉड” या गुन्ह्याला अधिकृत श्रेणीत समाविष्ट केले असून, त्यावरून या समस्येचे गांभीर्य स्पष्ट होते. अलीकडच्या काळात सरकारने परदेशातील बनावट भरती नेटवर्कविरुद्ध कारवाई करत अनेक भारतीय नागरिकांना वाचवले आहे. हे प्रकार या फसवणुकीचे धोके अधोरेखित करतात.


फेक नोकरी ऑफर ओळखण्याचे संकेत


फेडएक्सने सांगितले की, खोट्या नोकरीच्या ऑफर अनेकदा अत्यंत आकर्षक आश्वासनांसह समोर येतात. साध्या किंवा पार्ट-टाईम कामासाठी अत्यंत जास्त उत्पन्नाचे आश्वासन देणे, ही अशा ऑफरची पहिली खूण असते. काही फसवे लोक नोकरी अर्ज, प्रशिक्षण किंवा मुलाखतीसाठी तातडीने पैसे भरण्याची मागणी करतात. तसेच, नामांकित कंपन्यांच्या एचआरच्या नावाने अनाहूतपणे येणारे कॉल, ईमेल किंवा व्हॉट्सअ‍ॅप संदेश हेही संशयास्पद असतात.


अनेकदा अशा संदेशांमध्ये इतरांना भरती करून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे रेफरल योजनांचे आमिष दाखवले जाते. त्याचबरोबर, अधिकृत कंपनीच्या वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या बनावट साइट्स, उदा. fedx.com किंवा fed-ex.com वापरून फसवणूक केली जाते. अशा ईमेल किंवा संदेशांमध्ये चुकीचे शब्दलेखन, व्याकरणातील त्रुटी आणि अतिरेकी उद्गारचिन्हांचा वापर असतो, ज्यावरून त्यांची विश्वसनीयता सहज ओळखता येते.


खोट्या नोकरी ऑफरपासून कसे वाचाल: थांबा, विचार करा, आणि कृती करा


अनोळखी स्रोतांकडून आलेल्या नोकरीच्या ऑफरबाबत नेहमीच सतर्क रहा. प्रक्रिया खूपच सोपी किंवा सहज वाटत असल्यास ती फसवणुकीची असण्याची शक्यता असते. नोकरी मिळवण्यासाठी कधीही पैसे देऊ नका, कारण खऱ्या कंपन्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाहीत.


सर्व नोकरीच्या जाहिराती थेट अधिकृत स्त्रोतांवरूनच तपासा. उदाहरणार्थ, फेडएक्सच्या संधींबाबत खात्री करण्यासाठी अधिकृत FedEx Careers पृष्ठ किंवा कंपनीची अधिकृत सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. ईमेल पत्त्यांमधील लहान-सहान स्पेलिंग बदल किंवा अतिरिक्त शब्द हे फसवणुकीचे स्पष्ट संकेत असू शकतात, त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष द्या.


तसेच, अप्रमाणित प्लॅटफॉर्मवर किंवा अनोळखी भरती एजंटांना वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती देणे टाळा. परदेशातील नोकरीच्या संधींसाठी नियोक्ता आणि भरती एजंटची विश्वसनीयता संबंधित भारतीय दूतावासामार्फत पडताळून पहा. अशा काळजीपूर्वक पावलांमुळे आपण खोट्या नोकरीच्या ऑफरपासून सुरक्षित राहू शकता.


संशय आल्यास काय कराल:


फेडएक्सने स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या भरती फसवणुकीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता नसते; त्या लोकांच्या विश्वासाचा आणि निष्काळजीपणाचा फायदा घेतात. त्यामुळे उमेदवारांनी सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


जर तुम्हाला एखादी नोकरीची ऑफर संशयास्पद वाटत असेल किंवा फसवणुकीमुळे आर्थिक नुकसान झाले असेल, तर त्वरित सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.


सायबर सुरक्षेविषयी अधिक माहिती, अद्ययावत सूचना आणि सुरक्षिततेसाठीच्या टिप्स मिळवण्यासाठी नागरिकांना @CyberDost या भारत सरकारच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पवईतील आर ए स्टुडिओमध्ये थरार, शूटिंगच्या नावाखाली ओलीस ठेवलेल्या १७ मुलांची सुटका, एन्काउंटरमध्ये आरोपी ठार

मुंबई : पवई परिसरात घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण मुंबई हादरली. ‘शूटिंग ऑडिशन’च्या नावाखाली सुरू असलेल्या

देशात एआय क्रांतीला गती देण्यासाठी रिलायन्स आणि गुगल बनले नवे भागीदार

प्रति युजर ३५१०० किमतीच्या जिओ वापरकर्त्यांना १८ महिन्यांचा गुगल एआय प्रो अँक्सेस मोफत भारतात संस्थांना एआय

पवईतील ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : पवईत शूटिंगच्या नावाखाली निष्पाप मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Q2FY26 Results Update: ह्युंदाई मोटर, अदानी पॉवर, सिप्ला, स्विगीचा तिमाही निकाल जाहीर जाणून घ्या ठळक माहिती एका क्लिकवर

मोहित सोमण:आज अनेक कंपन्यांनी आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. नुकतेच ह्युंदाई, अदानी पॉवर, सिप्ला,

वस्तूंच्या उपभोगात झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांसाठी एलआयसीचा मोठा निर्णय! LIC Mutual Fund कंपनीकडून नवा 'LIC Consumption Fund NFO' लाँच

मोहित सोमण:आज एलआयसी म्युच्युअल फंडने सध्याच्या बदलत्या जागतिक परिस्थितीचा गुंतवणूकदारांना 'परिणामकारक' फायदा

पवईत शूटिंगच्या बहाण्याने २५ मुलांना खोलीत डांबले, अखेर सुरक्षा पथकाने केला गोळीबार

मुंबई : मुंबईतल्या पवई परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शूटिंगच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून सुरू