मोहित सोमण : जागतिक संमिश्रित कौल मिळाल्याने बाजारात सकारात्मकता कायम असली तरी गुंतवणूकदारांनी सकाळच्या सत्रात सावधगिरी बाळगल्याचे दिसते. आज सकाळी सत्र सुरूवातीला इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात किरकोळ घसरण झाली आहे. प्रामुख्याने बँकिंग शेअरसह मिड स्मॉल शेअर्समध्ये घसरण झाल्याने बाजाराला सपोर्ट लेवल मिळू शकली नाही. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ४८१.४६ अंकांने व निफ्टी १४९.३० अंकांने कोसळला आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकातील सकाळच्या सत्रात सर्वच निर्देशांकात घसरण झाली असून व्यापक निर्देशांकातही घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण फार्मा (१.२४%), आयटी (०.७२%), हेल्थकेअर (१.१८%), मिडस्मॉल आयटी टेलिकॉम (१.४२%) निर्देशांकात झाली आहे.
युएसने २५ बेसिसने व्याजदरात कपात केली असताना युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपींग यांची दक्षिण कोरियात भेट झाली. त्यांची दुर्मिळ पृथ्वी वस्तूवर चीनकडून घातलेले निर्बंध तसेच चीन व युएस यांच्यातील व्यापारी करारावर तोडगा या दोन मुद्यांवर दोन्ही नेत्यात महत्वाची चर्चा केली झाली. विशेषतः युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सकारात्मक प्रतिक्रिया आल्याने गुंतवणूकदारांच्या भावना बळावल्या असल्या तरी दुसरीकडे चीनने प्रस्ताव न मानल्यास ट्रम्प यांनी चीनवर अतिरिक्त कराचा बडगा लावण्याचे ठरवले आहे. यामुळेच गुंतवणूकदारांमध्ये स्पष्टता अद्याप आलेली नाही. याखेरीज युएस फेड गव्हर्नर जेरोम पॉवेल यांनी काल उशीरा व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात घोषित केली होती. त्यामुळे एकीकडे अमेरिकेतील वाढती महागाई, बेरोजगारी दुसरीकडे मागील आठवड्यातील सावरलेले ग्राहक किंमत महागाई दर, वाढलेला महसूल, व्यापारवाढ यामुळे आशेचा किरण युएस बाजारात कायम होता. या द्वंद्वाचा अधिक फटका आज आशियाई बाजारात दिसून येतो.
वॉशिंग्टन: अमेरिकेत आता नागरी अशांती आणि मोठ्या दंगली नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठी तयारी सुरू झाली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सर्व ...
आशियाई बाजारातील सुरूवातीला संमिश्रित किंबहुना किरकोळ घसरणीचा कल अधोरेखित झाला. सर्वाधिक वाढ हेंगसेंग (०.६५%) झाली असून सर्वाधिक घसरण गिफ्ट निफ्टी (०.७५%), सेट कंपोझिट (०.७३%) निर्देशांकात झाली आहे.
आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ फाईव्हस्टार बस फायनान्स (६.१३%), बीएलएस इंटरनॅशनल (४.९९%), सीपीसीएल (४.७१%), पीबी फिनटेक (४.३४%), इंडिया सिमेंट (४.२०%), ब्लू डार्ट एक्स्प्रेस (४.१५%), न्यूलँड लॅब्स (३.२८%), लीला पॅलेस (२.१५%), अनंत राज (२.०८%), आयआयएफएल फायनान्स (२.१४%) समभागात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण वोडाफोन आयडिया (११%), एनएमडीसी स्टील (४.९९%), डॉ रेड्डीज (४.४६%), इंडस (४%), एलआयसी हाउसिंग फायनान्स (३.०२%), दिल्लीवरी (२.५०%), एचएफसीएल (२.३५%), सेल (१.९९%), अपोलो ट्युब (१.९२%), महानगर गॅस (१.८२%), वरूण बेवरेज (१.८१%), झायडस लाईफसायन्स (१.७४%) समभागात झाली आहे.