सुरतहून साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाचा घाला! तिघांचा मृत्यू तर चारजण जखमी

नाशिक: सुरतहून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शना घेण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला केला. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास फॉर्च्युनर या चारचाकी वाहनाने शिर्डीला येत असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा अपघात एरंडगाव शिवारात नाशिक महामार्गावर झाला असून यात तिघांचा जागीच मृत्यू तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत.


अपघातातील मृत व्यक्तींमध्ये प्रणव अनुरभाई देसाई (वय ४०), पलक अजयभाई कपाडिया (वय ३५), सुरेशचंद्र कबीराज साहू (वय ३५) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये विष्णू मनोजकुमार छकवाला (वय २८), बिपीन नवीनचंद्र राणा (वय ४९), सागर निपुण शहा (वय ३०), विक्रम महेंद्रभाई उसवाल (वय ४२) यांचा समावेश आहे. अपघातातील सर्व व्यक्ती गुजरातच्या सुरत शहरात स्थायिक आहेत. सध्या जखमींवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




या प्रकरणी तालुका पोलिसांत नीरज अशोककुमार कापडिया (रा. जदाखाडी मैधरपुरा, सुरत) यांच्या फिर्यादीवरून चालक सागर निपुण शाह याच्याविरुद्ध भरधाव वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक करीत आहेत.

Comments
Add Comment

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून