मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ कांगारूं विरुद्ध पाच टी - २० सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द झाला असून आता दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याला काही तास बाकी असताना क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सराव करत असताना एका युवा क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे. २८ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आणि ३० ऑक्टोबरला त्याने रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.
कोण आहे तो खेळाडू ?
मेलबर्न नेट्सवर सर्व करताना चेंडू लागल्याने एका १७ वर्षीय क्रिकेटपटू बेन ऑस्टिनचा मृत्यू झाला आहे. मेलबर्न इस्टच्या गली क्रिकेट क्लब मधून खेळणाऱ्या ऑस्टिनच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. बेन ऑस्टिन हा चांगला फलंदाज होता. आणि तो नेट्सवर बॉलिंग मशिन्समोर फलंदाजीचा सर्व करत होता. सराव करताना त्याने हेल्मेट घातले होते, मात्र चेंडू त्याच्या मानेला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.
बेन ऑस्टिनला जवळच्या मोनाश सेंटरमध्ये दाखल करण्यात आले तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. फर्नट्री या गली क्रिकेट क्लबने एक निवेदन जारी करत "बेन ऑस्टिनच्या मृत्यू ही दुःखद बातमी असून आणि या कठीण काळात क्रिकेटपटूच्या कुटुंबासोबत आहोत." असे म्हटले आहे.
या आधी देखील अशाच प्रकारे एका खेळाडूचा मृत्यू झाला होता. २०१४ मध्ये शेफील्ड शिल्डमधे फलंदाजी करताना फील ह्युजचा मृत्यू देखील मानेवर चेंडू लागल्याने झाला होता. फर्नट्री या गली क्रिकेट क्लबने खेळाडूंच्या सुरक्षेची आणखी काळजी घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे.