महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातल्या आरोपीने लपवलेल्या मोबाईलमध्ये मिळाला मृत्यूपूर्वीचा 'तो' फोटो...

फलटण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरने स्वतः लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी फोटो संशयित आरोपी प्रशांत बनकर याला पाठविल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकरसोबत व्हॉट्सअॅपवर संवाद साधला होता. त्याच दरम्यान तिने तो सेल्फी पाठवला होता. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याची सखोल डिजिटल तपासणी केली असता हा फोटो उघडकीस आला. गुप्त सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे.


दरम्यान,व्हॉट्सअॅप चॅट्स डिलीट झाल्याचा आरोप डॉक्टर तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी सांगितले की, मिळालेल्या सर्व डिजिटल पुराव्यांची तपासणी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने सुरू आहे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


फलटण येथील या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध ठिकाणी नागरिक आणि वैद्यकीय कर्मचारी महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी आंदोलनं आणि मोर्चे काढत आहेत.


मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये तिने पोलिस अधिकारी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरवर लैंगिक तसेच मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment

Ashadhi Wari : ‘कापडी पिशवीची वारी’तून पर्यावरण आणि समतेचा संदेश; विशेष विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना वारकऱ्यांची दाद

मुंबई : यंदाच्या आषाढी वारीत भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक समावेशकतेचा संदेश देणारा एक अनोखा उपक्रम

Palghar School Holiday : पालघरमध्ये मुसळधार पावसाचा कहर; आज सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, डहाणू-तलासरीत पूरस्थिती

पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD)

Weather Update : मुंबई, ठाणे, रायगडसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पुढील 3 तास मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update :  गेल्या दोन दिवसांपासून मुंबई (Mumbai), उपनगरे, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी

Pune Rain : पुण्यात पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम; घाटमाथ्यावर रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : जुलैच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतले संतांच्या पादुकांचे दर्शन

पंढरपूर : “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज

Ashadhi Ekadashi 2026 : पांडुरंगाच्या कानात माशाच्या आकाराची कुंडले का असतात ? जाणून घ्या 'हे' गुपित अन् पौराणिक कथा!

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, वारकरी संप्रदायाचे प्राण आणि भक्तांचे पाठीराखे असलेल्या भगवान