महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा वापर आता महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये केला आहे. कोविड नंतर या ऑक्सिजन टाक्या इतर ठिकाणी काढून ठेवण्यात आल्या होत्या. या सर्व ऑक्सिजन टाक्यांचा वापर उपनगरातील चार रुग्णालयांमध्ये केला जाणार आहे. या चार रुग्णलयांमध्ये सात टाक्या बसवण्यात येणार असल्याने या सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन साठ्याची क्षमता वाढली जाणार आहे.


कोविड काळात निर्माण करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये मोठ्याप्रमाणात ऑक्सिजनचा साठा कमी पडत असल्याने त्यासाठीच्या टाक्या बसवण्यात आल्या होत्या. या टाक्यांमध्ये ऑक्सिजन भरणा करून कोविड सेंटरमधील रुग्णांना याचा लाभ दिला जात असे. कोविड काळात अनेक कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यात आला होता, रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता आणि परिणामी रुग्णांच्या मृतांची आकडेवारी घटली होती. परंतु कोविडचा आजार संपुष्टात आल्यानंतर कोविड सेंटर बंद करण्यात आली आणि ऑक्सिजनचा साठा करणाऱ्या टाक्यांसह इतर साहित्य हे कस्तुरबा रुग्णालयांसह इतर रुग्णालयांमध्ये सांभाळून ठेवण्यात आले. .


मात्र, आता उपनगरातील चार रुग्णालयांची क्षमता वाढीकडे वाटचाल सुरु असून या रुग्णालयांमध्ये आरोग्य पायाभूत सुविध कक्षाच्या माध्यमातून यांत्रिक आणि विद्युत विभागाला सुचना करून कोविड सेंटरमधून आणलेल्या १३ केएल एलएमओ टाक्या तिथे बसवण्याच्या सूचना केल्या. अशाप्रकारच्या ऑक्सिजन टाक्या या रुग्णालय परिसरात आवश्यक त्या परवानगीसह बसवण्यात येणार आहेत. यासाठी पेसो अर्थात पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑरगायझेशन(पेसो)प्रमाणित आराखडा, पाया बांधकाम, अग्निशमन उपकरणे तसेच संबंधित कामे करण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ८६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांसाठी मेडिशाइन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. पुढील ९ महिन्यांच्या कालावधीमध्ये या टाक्या बसण्याचे काम पूर्ण केले जाणार असून यामुळे मुलुंड एम टी अगरवाल, पंडित मदनमोहन मालवीय अर्थात गोवंडी शताब्दी, बोरीवली भगवती आणि कांदिवली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय अर्थात कांदिवली शताब्दी रुग्णालय या रुग्णांमधील ऑक्सिजची क्षमता अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


या चार रुग्णालयांमध्ये वाढणार ऑक्सिजन साठ्याची क्षमता


मुलुंड एम टी अगरवाल : २ टाक्या, १३ केएल


पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय : २ टाक्या


बोरीवली भगवती रुग्णालय : २ टाक्या


कांदिवली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय : १ टाकी

Comments
Add Comment

भिवंडीतील ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा; १० एकर जागेवर विशेष व्यवस्था, मंत्री मेघा बोर्डीकर यांची घोषणा

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा मुंबईपर्यंतचा विस्तार आणि ठाणे-भिवंडी परिसरातील

मुंबईतील गोरेगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तोडले महिलांच्या गालांचे लचके

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने महिलांच्या गालांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये

काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण, महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा

विलेपार्ल्यात महायुतीचा जोर, उबाठा आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हान

चित्र पालिकेचे विलेपार्ले विधानसभा  मुंबई (सचिन धानजी) : उत्तर मध्य मुंबईतील विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात

मुंबई पागडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र नियमावली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची घोषणा मुंबई : मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत