कंगना रणौतला कोर्टाचा दिलासा, वादग्रस्त प्रकरणातून जामीन मंजूर

मुंबई : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिला वादग्रस्त ट्वीट प्रकरणी कोर्टानं दिलासा दिला आहे. देशात झालेल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक ट्वीटमुळे अडचणीत आल्यानंतर भटिंडा न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.


एका वृद्ध महिलेनं कंगनावर चुकीच्या पद्धतीने तिची ओळख करून दिल्याचा आणि तिच्याबाबदल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप केला होता.


नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊयात ?


कंगना हिला शेतकरी आंदोलनाशी संबंधित एका ट्वीटमुळे कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला. या प्रकरणात महिंदर कौर यांनी कंगनावर खोट्या आरोपांचे आणि वक्तव्यांचे आरोप केले होते. या प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारींनंतर, बथिंडा न्यायालयानं कंगनाला जामीन मंजूर केला आहे. कंगनाने न्यायालयात तक्रारदाराची माफी मागण्याची इच्छा व्यक्त केली होती. कारण हा वाद गैरसमजूतीतून झाला होता. मात्र महिंदर कौर आजारी असल्याने त्यांचे पती न्यायालयात उपस्थित होते. हा मुद्दा केवळ महिंदर कौर यांचाच नव्हता तर शेकडो आंदोलक शेतकऱ्यांचाही होता. त्यामुळं न्यायालयाने महिंदर कौर यांच्या विचारले असता. त्यांनी सांगितले की स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत आणि किसान युनियन व इतरांशी चर्चा केल्यानंतरच कळवतील असे सांगितले


ही होती कंगनाची पोस्ट


कंगनानं एक ट्वीट रीट्वीट केलं होत. यात लिहिलं होत की,"हा हा हा, ही तीच आजी आहे. जी टाइम मॅगझीनमध्ये सर्वात प्रभावशाली भारतीय म्हणून आली होती. आता ती १०० रुपयांनाही आंदोलनासाठी उपलब्ध आहे". या ट्वीटमध्ये ज्या वृद्ध महिलेचा फोटो होता त्या भटिंडा येथील रहिवासी महिंदर कौर होत्या. दुसरीकडं, किसान मजदूर मोर्चाचे नेते मनजीत राय यांनी कंगनाकडून महिंदर कौर यांची प्रत्यक्ष माफी मागण्याची मागणी केली आहे. शेतकरी नेत्यानं म्हटलं की , "कंगनाने न्यायालयाकडून बोलावल्यावर माफी मागितली, पण आम्ही जेव्हा तिला माफी मागायला सांगतिली तेव्हा तिनं मागितली नाही"


न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना, कंगना रणौत म्हणाली की तिला भटिंडा इथं येऊन खूप आनंद झाला. ती पुढे म्हणाली की, महिंदर कौर यांची ओळख पटवण्यात माझा गैरसमज झाला होता. मी त्यांचा आणि प्रत्येक आईचा खूप आदर करते. मी त्यांच्या पतीशी बोलून खेद व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

मल्टिप्लेक्स तिकिटदर १०० ते १५० रुपये ठेवण्याची मागणी ; मंत्रालयात चित्रपट संघटनेची बैठक

मुंबई : राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी कायमस्वरूपी स्क्रीन राखून ठेवावी आणि तिकिट दर

मालवणी भाषेला कलेचे रुप देणारे 'वस्त्रहरण'कार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड!

मुंबई: मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकांचा पाया रचणारे प्रतिभावान नाटककार गंगाराम गवाणकर यांन४ वयाच्या ८६व्या

चला हवा येऊ द्या' नंतर निलेश साबळे यांचा नवा अंदाज! महाराष्ट्रातील 'वहिनीं'साठी घेऊन येत आहेत 'वहिनीसाहेब सुपरस्टार' शो

मुंबई: 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोडून बाहेर पडलेले डॉ. निलेश साबळे आता एका नव्या

ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर ‘कांतारा- चैप्टर 1’ या तारखेला दिसणार ओटीटीवर!

मुंबई : ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा- चैप्टर 1’ आता लवकरच ओटीटीवर येणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये

'ह्युमन कोकेन' हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर लवकरच होणार रिलीज ! पुष्कर जोगचा नवा प्रयोग

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीत क्वचित पाहिलेलं, वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषा मिटवणारं जग आता पडद्यावर येणार

'जामतारा २' फेम सचिन चांदवडेची २५ व्या वर्षी आत्महत्या, 'असुरवन'च्या प्रदर्शनापूर्वीच संपवली जीवनयात्रा

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता सचिन चांदवडे (Sachin Chandavade) याने २५ व्या