Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूर शहरापासून सुमारे ६५ किलोमीटर दूर असलेल्या मनोहरपूर (Manoharpur) परिसरात ही दुर्घटना घडली, ज्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही खासगी प्रवासी बस रस्त्यावरून जात असताना तिचा संपर्क अचानक हाय टेंशन विद्युत तारेला झाला. तारेचा स्पर्श होताच बसने क्षणार्धात पेट घेतला. बसला आग लागल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या या बसमध्ये ठेवलेल्या ५ ते ६ गॅस सिलेंडरचाही मोठा स्फोट झाला. या स्फोटांमुळे आग अधिक भडकली आणि बस पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत बसमधील सुमारे १२ प्रवासी आगीच्या झोक्यात आले. त्यापैकी २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, उर्वरित अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.



जयपूर बस दुर्घटनेवर मुख्यमंत्री भजनलाल शर्मांकडून शोक व्यक्त




मनोहरपूर येथे झालेल्या भीषण बस अपघातावर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हाय टेंशन तारेच्या स्पर्शामुळे झालेल्या या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री शर्मा यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (ट्विट) या घटनेबद्दल भावनिक प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले आहे की, "जयपूरच्या मनोहरपूर येथील बस अपघाताची दुर्घटना अत्यंत शोकदायक आहे. या दुर्घटनेतील मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो." यासोबतच, अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराबाबत त्यांनी तातडीने प्रशासनाला निर्देश दिले आहेत. जखमींना चांगल्यात चांगला उपचार मिळावा यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणांना तत्पर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रशासनाला मदत आणि बचाव कार्यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



'सातत्याने घडणारे अपघात चिंताजनक'


बस अपघातावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मात्र, याच निमित्ताने त्यांनी राज्यात सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या घटनांवरून सत्ताधारी सरकारला लक्ष्य केले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "जयपूर येथे घडलेली बस अपघाताची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेतील मृतांप्रती मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दु:खात सहभागी आहे." त्याच वेळी, त्यांनी राज्यातील वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त करत सरकारला जाब विचारला आहे. "राजस्थानमध्ये सातत्याने घडणाऱ्या अपघाताच्या घटना या अत्यंत चिंताजनक आहेत," असे मत गेहलोत यांनी व्यक्त केले आहे. गेहलोत यांच्या या वक्तव्यामुळे अपघाताच्या घटनेवरून राजकारण तापले असून, राज्य सरकारला आता वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आव्हान विरोधकांनी दिले आहे.

Comments
Add Comment

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात