डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या प्रवासी वाहनांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या समितीने या संदर्भात शिफारस केली आहे, ज्यामुळे डिझेल वाहनांचे उत्पादन आणि वापर टप्प्याटप्प्याने बंद होऊन इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांना चालना मिळण्याची शक्यता आहे.


भारताने २०७० पर्यंत 'शुद्ध-शून्य उत्सर्जन' लक्ष्य गाठायचे असेल, तर वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल अपरिहार्य असल्याचे नीती आयोगच्या ताज्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. डिझेल वाहनांना टप्प्याटप्प्याने हटवून सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वेगाने स्वीकार करणे ही पहिली आणि महत्त्वाची पायरी ठरेल, असे आयोगाने नमूद केले आहे.


अहवालानुसार, शहरी प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी डिझेल वाहनांची संख्या कमी करणे आवश्यक आहे. त्याऐवजी सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा. यासोबतच इथेनॉल मिश्रित इंधनावर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल वाहनांना, उच्च बायो-सीएनजी मिश्रणाला आणि हायब्रिड फ्लेक्स-फ्युएल मॉडेल्सना प्रोत्साहन देण्याची शिफारस करण्यात आली आहे.



आता पुढे काय बदलणार?


ग्राहकांसाठी : आगामी काळात डिझेल गाड्यांची खरेदी महाग पडू शकते किंवा त्यांचे उत्पादन थांबविले जाऊ शकते,


पर्याय : हायब्रिड आणि फ्लेक्स फ्यूल इंजिन असलेल्या गाड्यांकडे कल वाढणार.


उद्योग : ऑटोमोबाईल कंपन्यांना आता बॅटरी निर्मितीसोबतच हायड्रोजन आणि बायोगॅस तंत्रज्ञानावर गुंतवणूक करावी लागेल.

Comments
Add Comment

Mahadev Betting App : महादेव ॲप सट्टेबाजी प्रकरणी सीबीआयकडून ११ आरोपपत्रे दाखल

नवी दिल्ली: महादेव ॲप ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने गुरुवारी एक मोठी कारवाई करत

PM Narendra Modi in Melbourne : ऑपरेशन सिंदूर’चा डंका जगभर, मेलबर्नमध्ये ३० हजार भारतीयांसमोर पंतप्रधान मोदींचा ठाम संदेश

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी मेलबर्न

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतली ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांची भेट

मेलबर्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी मेलबर्न

DRDO : डीआरडीओकडून ‘पिनाका’ लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित रॉकेटची यशस्वी उड्डाण चाचणी

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) 8 जुलै 2026 रोजी चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावर

Amayra Suicide Case : वर्गशिक्षिकेकडे वारंवार मदत मागितली पण.., अमायराच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

अमायराच्या आत्महत्याप्रकरणी  शाळेच्या भूमिकेवर प्रश्न, त्या क्षणाच्या व्हिडिओ व्हायरल  जयपूर : जयपूरमधील (Jaipur)

Agra ARTO Raid : माजी सरकारी अधिकाऱ्याच्या घरात 'कुबेराचा खजिना'; २२ किलो सोनं-चांदी, १.६२ कोटींची रोकड जप्त

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) येथे एका माजी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या (ARTO) घरावर टाकलेल्या