फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीला तिच्या पूर्वीच्या प्रियकराची साथ मिळाली. हत्या केल्यानंतर दोघांनी मिळून मृतदेह जाळून गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचा खोटा बनाव रचला. मात्र पोलिसांच्या चौकशीत त्यांचा संपूर्ण कट उघडकीस आला असून, या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान या खुनामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.


मृत युवकाचं नाव रामकेश मीणा असं असून, त्याची हत्या त्याची प्रेयसी अमृता चौहान हिनं केली. अमृता फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी असल्याने तिला गुन्हा लपवण्याचे अनेक तांत्रिक उपाय माहीत होते. तिनं तेच वापरून रामकेशचा खून केल्यानंतर घरात सिलिंडरचा स्फोट घडल्याचा बनाव केला. परंतु पोलिसांच्या तपासात तिचा हा कट फसला.


अमृतानं चौकशीत कबुली दिली की, रामकेशकडे तिचे अश्लील व्हिडीओ होते. तिनं ते व्हिडीओ डिलीट करण्याची मागणी केली होती, पण रामकेशनं नकार दिला. त्यामुळे संतापाच्या भरात तिनं तिच्या आधीच्या प्रियकराच्या मदतीनं त्याची हत्या केली.


या प्रकरणाच्या पुढील तपासात पोलिसांना आणखी एक हादरवून टाकणारी माहिती मिळाली. रामकेशच्या फ्लॅटमधून जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिस्कमध्ये १५ पेक्षा अधिक महिलांचे नको त्या अवस्थेतील व्हिडीओ आढळले आहेत. पोलिसांच्या मते, या महिलांपैकी काहींना या व्हिडीओंबद्दल माहिती नसावी. त्यामुळे पोलिस आता या सर्व महिलांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि व्हिडीओ त्यांच्या संमतीने रेकॉर्ड केले होते की नाही, याचाही तपास सुरू आहे.


एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, “तपासात असं दिसतंय की मृत रामकेश अनेक महिलांशी संपर्कात होता आणि त्यांच्या व्हिडीओंचा गैरवापर करत होता. त्याचा लॅपटॉपही तपासासाठी जप्त केला आहे. हार्ड डिस्कमध्ये अनेक फाईल्स सापडल्या असून त्यात १५ पेक्षा जास्त महिलांचे अश्लील व्हिडीओ आहेत.”


६ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील गांधी विहार परिसरातील तिमारपूर येथील फ्लॅटमध्ये रामकेशचा जळालेला मृतदेह सापडला होता. सुरुवातीला पोलिसांनी हा प्रकार सिलिंडर स्फोटातील मृत्यू असल्याचं गृहीत धरलं होतं. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना दोन व्यक्ती मृताच्या घरात शिरताना आणि काही वेळानंतर बाहेर पडताना दिसल्या. यावरून संशय वाढला आणि तपासाचा धागा सापडला. मोबाईल लोकेशन आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं आणि संपूर्ण गुन्हा उघडकीस आला.

Comments
Add Comment

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही

१ कोटींचा इनामी माओवादी हिडमा अखेर ठार; सीमेवर भीषण चकमक

छत्तीसगढ : कुख्यात माओवादी कमांडर मडवी हिडमा अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात सापडला. आंध्र प्रदेशातील अल्लुरी

'दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू'

नवी दिल्ली: दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू आणि कठोर शिक्षा करू, असे केंद्रीय

लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही

सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी  उत्तर प्रदेश  : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप

उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश  : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी

एसबीआयची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

खातेदारांना शोधावे लागतील नवीन पर्याय नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच