'I popstar' मधून व्हायरल झालेली राधिका भिडे नक्की आहे तरी कोण ?

मुंबई : ओटीटी विश्वातील 'I popstar' या कार्यक्रमाचा प्रोमो झळकला आणि लक्ष वेधून घेतलं ते गोड आवाजाच्या गोड दिसणाऱ्या कोकण कन्या राधिका भिडे हिने. तिच्या गोड आवाजातलं 'मन धावतया' हे गाणं आजकाल सर्वांच्याच ओठांवर आहे. तिच्या या मधाळ आवाजाने तिने प्रेक्षकांचेच नव्हे तर 'I Popstar' मधील जजेसचे देखील मन जिंकून घेतले आहे.


या कार्यक्रमात तिने गायलेली 'मन धावतंया' आणि 'पुन्हा पुन्हा' ही दोन्ही गाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कार्यक्रमातील अनुभवाविषयी बोलताना राधिका म्हणाली 'दर आठवड्याला दिलेल्या थीमवर आधारित गाणं लिहून ते सादर करण्यापर्यंत सगळं काही स्पर्धकांना सादर करण्याची संधी देणारा हा एकमेव रिअॅलिटी शो आहे. माझ्या 'मन धावतया' या गाण्याला कार्यक्रमाच्या मंचावर आणि सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तो प्रतिसाद एवढा आहे की, इंस्टाग्रामवर माझे फॉलोअर्स ८६ हजारांच्या वर गेले आहे. मला नेहमीच स्वतःची गाणी सादर करायची होती. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यासपीठाच्या शोधात होते. तो या कार्यक्रमामुळे मिळाला आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गाण्याचे शब्द सुचणे हे मोठं आव्हानात्मक आहे. या आवाहनाला सामोरं जाताना माझ्यातील कौशल्यांचा कस लागत आहे.


'I Popstar' या कार्यक्रमात देशातील विविध भागांमधून निवडलेल्या स्पर्धकांना स्वतः गाणी लिहून, त्याला संगीत देऊन ती परीक्षकांसमोर सादर करायची असतात. एवढंच नाही तर त्यांनी सादर केलेली गाणी ही सोशल मीडियावर देखील शेअर केली जातात, ती शेअर केलेली गाणी सोशल मीडियावर किती व्हायरल होत आहेत. हे पॉईंट्स देखील फायनलसाठी मोजले जाणार आहेत. या रिअॅलिटी शोच्या आधी राधिकाने हिंदी सिरीज 'ताजा खबर' आणि 'दे धक्का २' व 'हर हर महादेव' या मराठी सिनेमांसाठी बॅकग्राऊंड स्कोअरिंग आणि व्होकल प्रॉडक्शनचं काम पाहिलं आहे. याशिवाय तिने काही गुजराती गाण्यांसाठी बॅकग्राऊंड स्कोअरिंगच काम केलं आहे. तसंच तिची गाणी देखील लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

Comments
Add Comment

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर

‘रुबाब’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिलीच झलक आणि ‘तुझ्यासारखी

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ ३० जानेवारीपासून चित्रपटगृहात

नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

आणखी एका कलाकाराच्या घराला आग! बॉलिवूड दिग्दर्शकालाही आगीच्या विळख्याचा धक्का

मुंबई: आज सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील सोरेंटो अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली.