सुजाता मडके या शहापूरच्या कन्येची ‘इस्रो’मध्ये थरारक झेप

ठाणे : ‘यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते,’ या शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शहापूर तालुक्यातील शिरगाव (जि. ठाणे) येथील सुजाता रामचंद्र मडके हिचे अभिनंदन केले आहे.


सध्या ठाणे शहरातील मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुजाता मडके यांची प्रतिष्ठित भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाने केवळ ठाणे जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण परिवहन विभागाचा गौरव वाढवला आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.


मंत्री सरनाईक म्हणाले की, साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुजाता यांनी आपल्या शिक्षणात सातत्य राखत, आयुष्यभर कष्ट आणि चिकाटीचा आदर्श घालून दिला. त्यांच्या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अविरत मेहनत यांचा सुंदर संगम दिसून येतो.


ते पुढे म्हणाले,अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेली ही झेप ग्रामीण भागातील तरुणाईसाठीही आशेचा किरण आहे. स्वप्न मोठे असावे, मेहनत प्रामाणिक असावी आणि आत्मविश्वास दृढ असावा, यश नक्कीच मिळते,’ हे सुजाता मडके यांच्या यशकथेतून स्पष्ट जाणवते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून संपूर्ण परिवहन विभागाने सुजाता मडके यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड