मोहित सोमण:पहिल्या दिवशी जयेश आयपीओला सकाळी १.१० वाजेपर्यंत १.५५ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यामुळे आयपीओ बिडिंगची सकारात्मक सुरूवात झालेली आहे. आतापर्यंत ५४% वाटा बिडिंग फूल झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. जयेश लॉजिस्टिक्स लिमिटेड (Jayesh Logistics Limited) कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात सूचीबद्ध (Listed) होत आहे. २८ कोटींचा हा एसएमई आयपीओ (SME IPO) २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान बाजारात गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. तर हा आयपीओ एनएसई एसएमई व्यासपीठावर सूचीबद्ध होईल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीकडून ११२ ते १२२ रूपये प्रति शेअर प्राईज बँड (Price Band) निश्चित करण्यात आलेला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना (Retail Investors) किमान आयपीओसाठी २४४००० रूपयांची (2000 Shares) गुंतवणूक निश्चित करण्यात आली होती.
Indcap Advisors Pvt Ltd ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Kfin Technologies Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. मार्केट मेकर म्हणून Giriraj Stock Broking Pvt Ltd आयपीओसाठी काम करेल. पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) ३० ऑक्टोबरला अपेक्षित असेल. माहितीनुसार, एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी किरकोळ गुंतवणूकदारांकडून ३३.२३% वाटा, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) ४७.३८% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) १४.२७% वाटा, मार्केट मेकरसाठी ५.११% वाटा उपलब्ध असेल. एकूण २३३७००० शेअर कंपनीने आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. यातील १२०००० शेअर मार्केट मेकरसाठी असतील तर उर्वरीत २२२७००० शेअर पब्लिक इशूसाठी उपलब्ध असतील.
संजय कुमार कुंडालिया, नविता कुंडालिया, बिष्णू कुमार बजाज, रश्मी बजाज, आरएचएमबी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. आयपीओपूर्वी प्रवर्तकांचे भागभांडवल ९७.५७% होते ते आयपीओनंतर घसरत ७१.२२% होईल. काल कंपनीने आयपीओपूर्व ६.७८ कोटीचा निधी अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केला आहे.
२०११ साली या कंपनीची स्थापना केली होती. प्रामुख्याने ही कंपनी व्यापक लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रदाता. हे विशेषतः इंडो-नेपाळ कॉरिडॉर आणि नेपाळच्या अंतर्गत भागात सीमापार मालवाहतुकीवर लक्ष केंद्रित करते. कंपनी शिपमेंटची रिअल-टाइम दृश्यमानता आणि फ्लीट मॉनिटरिंगसाठी SAP सह एकत्रित केलेल्या GPS ट्रॅकिंग सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते.
त्यांचा मालकीचे SMART-SYS सॉफ्टवेअर फ्लीट व्यवस्थापन स्वयंचलित आणि वाढविण्यासाठी ERP, GPS/RFID, ब्लॉकचेन ई-POD आणि AI-चालित CRM संचलित करते.कंपनी विविध क्षेत्रांना सेवा देते ज्यामध्ये एफएमसीजी, रिटेल ऑटोमोटिव्ह आणि जड उपकरणे उत्पादन, औद्योगिक वस्तू ,औषधे,आरोग्यसेवा, सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (PSUs) यांचा समावेश आहे.
कंपनीच्या इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) महसूलात २७% वाढ झाली असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) १२८% वाढ झाली आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १०६.०४ कोटी रूपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सामान खरेदीसाठी, खेळत्या भांडवल गरजेसाठी (Working Capital Requirements), आगामी फेज २ व्यापक विस्तारासाठी, दैनंदिन कामकाजासाठी (General Corporate Purposes) करण्यात येणार आहे असे कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. सकाळी १.२६ वाजेपर्यंत कंपनीला १.८६ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले असून एकूण सबस्क्रिप्शनपैकी ०.९५ पटीने सबस्क्रिप्शन किरकोळ गुंतवणूकदारांकडून, १.५० पटीने पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून, ४.६० पटीने सबस्क्रिप्शन विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मिळाले आहे.