पोलिसांनी तरुणीसह आरोपींच्या फोनचे CDR काढले, हाती आली 'ही' माहिती


सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचा तपास पोलीस करत आहेत. या तपासाचा आढावा घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेतली. या भेटीनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देण्यात आली.


पोलिसांनी आत्महत्या करणारी डॉक्टर तरुणी तसेच आरोपी पीएसआय गोपाल बदने आणि आरोपी प्रशांत बनकर या तीन जणांच्या फोनचे सीडीआर काढले आहेत. यातून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. जानेवारी ते मार्च या काळात डॉक्टर तरुणी गोपाळ बदनेच्या संपर्कात होती नंतर ती प्रशांत बनकरच्या संपर्कात होती. पोलीस आता जानेवारी ते मार्च काळातील डॉक्टर तरुणी आणि पीएसआय गोपाल बदने या दोघांची लोकेशन जाणून घेत आहेत. दोघे कधी एकत्र एकाच लोकेशनवर होते का याचाही तपास केला जाणार आहे. न्यायालयाने प्रशांत बनकरला २८ ऑक्टोबरपर्यंत आणि बदनेला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस दोन्ही आरोपींची सखोल चौकशी करत आहेत. डॉक्टर तरुणीचा पोस्टमॉर्टिम रिपोर्ट लवकरच पोलिसांना मिळेल. हा रिपोर्ट मिळाल्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.




Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गावरील कार अपघातात एका महिलेचा मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपासवर इन्सुली येथे रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका कारचा भीषण

Pratap Sarnaik : व्यवहारिक मराठी न येणाऱ्या १,२६८ चालकांना नोटिस; महिनाभरात मराठी शिका, अन्यथा बॅज निलंबित

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी

FDA Raid : पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित तर १९.९० लाखांचे खाद्यपदार्थ जप्त!

पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने १७ ते २० ऑगस्ट दरम्यान पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली

Mumbai Local : किरकोळ वाद झाला अन् प्रवाशाला चक्क धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिलं

मुंबई : चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये किरकोळ वादातून एका प्रवाशाला धावत्या डब्यातून

Nitesh Rane : मासेमारी बंदी कालावधीत मच्छिमारांना मिळणार आर्थिक मदत

- मत्स्य विभागाचा वित्त विभागाकडे प्रस्ताव; ८ हजार ८२९ मच्छीमार कुटुंबांना होणार लाभ मुंबई : पावसाळ्यात दोन ते

UBT : धाराशिव जिल्ह्यात 'उबाठा'ला खिंडार

- १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; राणा जगजीतसिंह पाटलांनी ओमराजे-कैलास पाटलांना दिला मोठा धक्का मुंबई : धाराशिव