मोहित सोमण: शनिवारी टेक्नॉलॉजी (आयटी) कंपनी कोफोर्ज लिमिटेडने आपला तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात तिमाही बेसिसवर (QoQ) १८.४% वाढ झाल्याने एकत्रित निव्वळ नफा (Consolidated Net Profit) ३७५.८% कोटींवर पोहोचला आहे. निकालानुसार कंपनीच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ३४९ कोटीवरून ३७४.८ कोटीवर वाढ नोंदवली गेली आहे. सकाळी कंपनीचा शेअर सुरूवातीलाच शेअर ६% इंट्राडे उच्चांकावर उसळला होता. इयर ऑन इयर बेसिसवर तब्बल ८६% वाढ कंपनीने नोंदवल्याने ब्रोकरेज कंपन्यांनी शेअरला बाय कॉल दिला होता. सकाळी १०.१९ वाजता कंपनीचा शेअर ४.६३% उसळल्याने १८४१.९० रूपये प्रति शेअरवर पोहोचला आहे.
तिमाहीत कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) तिमाही बेसिसवर (QoQ) ८.५% वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या ३६८८.९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत महसूल ३९८५.७ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीचा ईबीटा (EBITDA) गेल्या तिमाहीतील ६३१.४ कोटीवरून तिमाही बेसिसवर उसळत या तिमाहीत ७२८.२ कोटींवर पोहोचला आहे. माहितीनुसार ईबीटा मार्जिनमध्ये गेल्या तिमाहीतील १७.१% तुलनेत या तिमाहीत १८.३% वाढ तिमाही बेसिसवर झाली आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने (Board of Directors) दुसरा अंतरिम लाभांश (Interim Dividend) निकाला दरम्यान जाहीर केला आहे. प्रति इक्विटी शेअर ४ रूपयाचा दुसरा अंतरिम लाभांश देखील जाहीर केला ज्याचे दर्शनी मूल्य (Face Value) प्रति शेअर २ रूपये आहे.त्यांनी ३१ ऑक्टोबर २०२५ ही त्यांच्या पेमेंटसाठी रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे असे त्यांनी आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले होते.
आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत, कंपनीने उत्तर अमेरिका आणि आशियाई क्षेत्रांमध्ये पाच मोठे करार केले होते. याशिवाय ऑर्डरबुक १.६३ अब्ज डॉलर्सवर पोहोचले जी २६.७% वाढ नोंदवते.
नोमुरा ब्रोकिंग कंपनीला आर्थिक वर्ष २६ मध्ये अमेरिकन डॉलरच्या दृष्टीने अंदाजे २९% वार्षिक उत्पन्न वाढ अपेक्षित आहे तर ब्रोकिंग रिसर्चने दिलेल्या माहितीत इबिट मार्जिन १४% शाश्वत राहील असे म्हटले आहे. ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल १९०० रूपये प्रति शेअरच्या लक्ष्य किंमतीसह (Target Price TP) दिला आहे.
मोतीलाल ओसवाल यांनीही शेअरवर सकारात्मक भाष्य केले आहे. त्यांनी सर्व उभ्या क्षेत्रात क्लायंट खर्चाच्या लवचिकतेवर भर दिला. ब्रोकरेजने नमूद केले की कोफोर्जची १२ महिन्यांची एक्झिक्युटेबल ऑर्डर बुक $१.६ अब्जवर स्थिर राहिली आहे, जी वार्षिक सरासरीपेक्षा २५-२७% वाढली आहे. ब्रोकरेज मते, ज्यामुळे कंपनीच्या सेंद्रिय वाढीच्या (Organic Growth) संभाव्यतेवर (Potential) विश्वास वाढला आहे.
'महसूल, इबिट आणि समायोजित पीएटी आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या सहामाहीत अनुक्रमे ३२%,४८% आणि ५९% वार्षिक सरासरीने वाढण्याची अपेक्षा आहे' असे मोतीलाल ओसवाल म्हणाले आहेत. दरम्यान त्यांनी जून २०२७ च्या अंदाजित ईपीएसच्या (Earning per share EPS) ३८ पटीने स्टॉकचे मूल्यांकन केले आहे, त्यांनी लक्ष्य किंमत २४०० रूपये प्रति शेअरसह शेअरवर बाय कॉल कायम ठेवला आहे.
एकूणच विश्लेषकांचा मते, मुक्त रोख प्रवाहातील (Free Cash Flow) सुधारणा ही एक महत्त्वाची बाब होती. कोफोर्जने तिमाहीत $36.5 दशलक्ष मुक्त रोख प्रवाह निर्माण केला, जो करोत्तर नफाच्या (PAT) ८४% आहे आणि Q1FY26 मध्ये $२२ दशलक्ष नकारात्मक वरून सकारात्मक झाला. असे असले तरी, विश्लेषक सहमत आहेत की कोफोर्ज मिड-कॅप आयटी कंपन्यांमध्ये चांगल्या स्थितीत आहे. त्याची मजबूत ऑर्डर बुक, सकारात्मक रोख प्रवाह आणि वाढणारे मार्जिन वाढीसाठी एक मजबूत पाया प्रदान करतात. तंत्रज्ञानावर कंपनीचे लक्ष आणि मोठ्या डील विजय हे प्रमुख चालक म्हणून पाहिले जातात जे येत्या तिमाहीत कमाईला आधार देऊ शकतात.
निकालांवर भाष्य करताना, कोफोर्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक सुधीर सिंग म्हणाले होते की,'दुसऱ्या तिमाहीत ८.१% अनुक्रमिक INR वाढ, पुढील बारा महिन्यांच्या स्वाक्षरी केलेल्या ऑर्डर बुकपेक्षा २६.७% जास्त आहे, विक्री अंमलबजावणी इंजिन ज्याने गेल्या वर्षी १४ मोठे करार केले होते आणि या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आधीच १० मोठे करार पूर्ण केले आहेत.'
'इबीआयटी मार्जिनमध्ये २५० बीपीएसचा वाढ आणि उद्योगातील सर्वात कमी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा दर हे सर्व २०२६ हे एक अपवादात्मक आर्थिक वर्ष असेल असे आम्हाला वाटते याचे संकेत आहेत. अनिश्चित मॅक्रो असूनही सलग नवव्या वर्षी शाश्वत आणि मजबूत वाढीच्या आमच्या वचनबद्धतेवर आम्ही दृढ आहोत' असे सिंग पुढे म्हणाले.
शुक्रवारी एनएसईवर कॉफोर्जचे शेअर्स ०.३०% वाढून १७६० प्रति शेअरवर बंद झाले होते. तथापि बाजार सत्र बंद झाल्यानंतर कमाई जाहीर करण्यात आली होती.